सर्वांगीण शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’चा भर : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सर्वांगीण शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’चा भर : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

टाईम्स बी-स्कुल सर्वेक्षण २०२४ मध्ये सलग अकराव्या वर्षी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची चमकदार कामगिरी
 
पुणे : टाईम्स बी-स्कुल सर्वेक्षण २०२४ मध्ये सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने चमकदार कामगिरी केली आहे. सलग अकराव्या वर्षी ‘टॉप ५० बी-स्कुल’मध्ये ‘सूर्यदत्त’चा समावेश झाला आहे. सर्वसाधारण रँकिंगमध्ये ३४ वे, प्लेसमेंट कॅटेगरीत २५ वे, उल्लेखनीय खासगी संस्था केटॅगरीत २२ वे, तर ‘टॉप २० वेस्ट बी-स्कुल’च्या कॅटेगरीत १६ वे स्थान मिळाले आहे. शैक्षणिक उत्कृष्टता, विद्याशाखा गुणवत्ता, उद्योग संवाद, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट धोरण आणि सपोर्ट आदी निकषांवर हे रँकिंग ठरवले जाते.
 
‘टाईम्स बी-स्कुल’ सर्वेक्षणातील या उल्लेखनीय कामगिरीमुळे ‘सूर्यदत्त’च्या सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले आहे. एकविसाव्या शतकात अपेक्षित असे व्यावसायिक नेतृत्व विकसित करण्यासाठी तरुणांमधील सुप्तगुणांना वाव देण्याचे काम सूर्यदत्त करत आहे. सर्वांगीण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासह विद्यार्थ्यांतील प्रतिभेचे संगोपन करून एकविसाव्या शतकातील व्यावसायिक नेतृत्वाला आकार देण्याच्या वचनबद्धतेचे हे यश आहे
 
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम एमबीए, पीजीडीएम महाविद्यालयांपैकी एक आहे. उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, औद्योगिक संवाद, चांगले प्लेसमेंट रेकॉर्ड अशी सूर्यदत्तची ओळख आहे. या संस्थेला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बी-स्कूलमध्ये विशेषत: ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, पुणे येथे मानाचे स्थान आहे. सूर्यदत्तमध्ये पीजीडीएम आणि एमबीए, एमसीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सर्वसमावेशक शैक्षणिक अनुभव देऊन विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगासाठी तयार करण्याला सूर्यदत्तचे प्राधान्य आहे. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अत्याधुनिक पायाभूत सुविधा, हरित आणि डिजिटल कॅम्पस, क्रीडा-अनुकूल, पर्यावरण, सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळेने सुविधा संपन्न आहे. सूर्यदत्त केवळ उच्च-गुणवत्तेचे शिक्षणच देत नाही, तर विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकास व्यवस्थापन शिक्षणाचा एक आदर्श पर्याय आहे.
 
सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगताच्या आव्हानांसाठी पूरक असे सर्वांगीण विकासाचे शिक्षण सर्वांना देण्यावर विश्वास ठेवतो. विद्यार्थ्यांना व्यवसायाची सर्वसमावेशक समज, त्याची विविध कार्ये आणि त्यांच्यातील परस्परसंवाद विकसित होईल अशा दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. उद्योग भेटी, इंटर्नशिप, प्रत्यक्ष प्रकल्प आणि तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन यातून विद्यार्थ्यांना व्यापक ज्ञान मिळते. टाईम्स बी-स्कुल सर्वेक्षण देशातील बिझनेस स्कुलचे सर्वंकष मूल्यांकन करणारी यंत्रणा आहे. संशोधन, आकलन सर्वेक्षण व तथ्यात्मक माहितीच्या आधारे हे सर्वेक्षण केले जाते. असे सर्वेक्षण हे विद्यार्थी, पालक आणि रोजगार देणाऱ्यांसाठी माहितीचा एक विश्वासार्ह स्रोत आहे.”
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुढे म्हणाले की, टाईम्स बी-स्कूल सर्वेक्षण २०२४ मधील टॉप ५० बी-स्कूलमध्ये सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने प्लेसमेंटसाठी २५ व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, उद्योजक, भागीदार आणि हितचिंतक या सर्वांचे सतत समर्थन आणि विश्वास मिळाल्याने हे यश मिळाले आहे. सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्तने इंडस्ट्री ४.० इनोव्हेशन लॅबची स्थापना केली आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देतानाच कृत्रिम बुद्धिमतेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे. ९००००+ पेक्षा जास्त विद्यार्थी याचा भाग आहेत, जे प्लेसमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. गेल्या काही वर्षांत, सूर्यदत्त विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा, दूरसंचार, कृषी व्यवसाय, फार्मा, ऑटोमोबाईल्स, ऑटोमेशन इ. तसेच आयटी/आयटीईएस, रिअलच्या उच्च वाढीच्या क्षेत्रात, इस्टेट, वित्तीय सेवा, विमा आणि किरकोळ यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये स्थान देण्यात आले आहे.”
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *