पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्ता नॅशनल स्कूलचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. २० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
विज्ञान शाखेत साजल देवळीकर आणि नेहा मुंगळे यांनी ९७.६ टक्के गुण मिळवत, तर कॉमर्स शाखेत तनिष भंडारीने ८७.४ टक्के गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. सुब्रनील चॅटर्जी आणि साजल देवळेकर यांना गणित विषयात सर्वाधिक ९९, नेहा मुंगळे हिला रसायनशास्त्रात सर्वाधिक ९९, साजल देवळेकरला भौतिकशास्त्रात सर्वाधिक ९९, सुहानी कोरपे व दिशा लव्हेकर याना जीवशास्त्रात सर्वाधिक ९९, शौनक सुभेदार याला शारीरिक शिक्षण विषयात सर्वाधिक ९९, साजल देवळीकर व श्रिया पोरे यांना आयपी विषयात ९८, सुमद्र हजारे व सुब्रनील चॅटर्जी यांना इंग्रजी विषयात ९८, तर आरोही मुळीक हिला बिझनेस स्टडिजमध्ये ९७ आणि अर्थशास्त्रात ९६ गुण मिळाले आहेत.
प्लेग्रुप ते बारावीपर्यंत शिक्षण देत असलेल्या आणि अनेक पुरस्करप्राप्त, सीबीएसई मान्यताप्राप्त सूर्यदत्ता नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी अनिश्चित असतानाही विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान, शिकवण्याच्या पद्धती, ऑनलाईन क्लासेस, असेसमेंट आणि मूल्यांकन पद्धती आत्मसात करीत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या प्राचार्या आणि त्यांच्या शिक्षक सहकार्यांच्या मेहनतीमुळे आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या परस्पर सहकार्यामुळेच हे यश मिळाले आहे, अशा शब्दांत सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय बी. चोरडिया, सुर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या सचिव सुषमा चोरडिया यांनी प्राचार्य, शिक्षकांचे, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.