कोची येथे झालेल्या ‘ग्लोबल फूड अँड हॉस्पिटॅलिटी अवॉर्ड्स २०२३’ मध्ये ‘सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम’ला (एससीएचएमटीटी)’बेस्ट कॉलेज फॉर हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड कलिनरी आर्टस् इन इंडिया’ पुरस्कार

कोची येथे झालेल्या ‘ग्लोबल फूड अँड हॉस्पिटॅलिटी अवॉर्ड्स २०२३’ मध्ये ‘सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम’ला (एससीएचएमटीटी)’बेस्ट कॉलेज फॉर हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड कलिनरी आर्टस् इन इंडिया’ पुरस्कार

सकारात्मक विचार, हसतमुखाने विद्यार्थी सेवा हाच ‘सूर्यदत्त’च्या यशाचा मंत्र : संजीव कपूर
 
कोची येथे सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमला 
‘बेस्ट कॉलेज फॉर हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड कलिनरी आर्टस् इन इंडिया’ पुरस्कार देताना २० वर्षांच्या आठवणींना दिला उजाळा
 
पुणे : कोची येथे झालेल्या ‘ग्लोबल फूड अँड हॉस्पिटॅलिटी अवॉर्ड्स २०२३’ मध्ये पुण्यातील नामांकित सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमला (एससीएचएमटीटी) ‘बेस्ट कॉलेज फॉर हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड कलिनरी आर्टस् इन इंडिया’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’ परिवाराच्या वतीने या पुरस्काराबद्दल ‘एससीएचएमटीटी’च्या सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले.
 
हॉटेल क्राऊन प्लाझा, कोची येथे नुकत्याच झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त’च्या वरिष्ठ फॅकल्टी प्रा. प्रीती कुमठा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील गुणवत्तापूर्ण व प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण, इंटर्नशिपच्या संधी, प्लेसमेंट्स आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी या सर्व बाबी लक्षात घेऊन ‘एससीएचएमटीटी’ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 
जागतिक स्तरावरील कामाच्या स्वरूपाचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे यासाठी नामांकित वैश्विक संस्थांशी ‘एससीएचएमटीटी’ने सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये स्विस्सम रशिया, लिंकन विद्यापीठ मलेशिया, लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपिटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट (एएचएलईआय), आदी संस्थांचा समावेश आहे. ‘जीएचआरडीसी’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘एससीएचएमटीटी’चा टॉप हॉटेल मॅनेजमेंट इन्सिट्यूट्स ऑफ एक्सलन्स इन इंडियामध्ये पाचव्या स्थानावर, तर महाराष्ट्रातील प्रायव्हेट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवर्गात तिसऱ्या स्थानावर समावेश झाला होता.
 
सावित्राईबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, ‘नॅक’ अधिस्वीकृतीधारक आणि तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त ‘एससीएचएमटीटी’ची स्थापना २००५ मध्ये झाली. कॉलेजला आयएसओ ९००१:२०१५ असे प्रमाणपत्र मिळालेले आहे. ‘एससीएचएमटीटी’तर्फे बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम चालवला जातो. हॉस्पिटॅलिटी क्षेतत्रातील व्यावसायिक आणि उद्योजक घडविण्यावर येथे भर दिला जातो. अभ्यासक्रमातील शिक्षणासोबतच ‘एससीएचएमटीटी’च्या वतीने औद्योगिक कंपन्यांना भेटी, तज्ज्ञांचे सेमिनार्स, संकल्पनेवर आधारित भोजन, फूड फेस्टिवल आयोजिले जातात. या क्षेत्राचे सखोल आणि प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी विविध उपक्रम राबवून त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करण्यास प्रोत्साहित केले जाते.
 
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “फूड व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, जिथे विविध प्रकारची रेस्टॉरंट्स, अन्न सेवा पुरवठादार, शेफ आणि अन्न-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या घटकांची निवड विविध स्तरांवर केली जाते. पुरस्कार विजेत्यांकडून त्यांचा युनिक सेलिंग पॉईंट, इनोव्हेशन्स, उपलब्धी यांचे दर्शन घडवले जाते. ‘एससीएचएमटीटी’मध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकवृंद, उत्तम पायाभूत सुविधा आहेत. आजवर विक्रमी प्लेसमेंट्स करत देशात आणि विदेशात ‘एससीएचएमटीटी’चे विद्यार्थी यशस्वीपणे आपले करिअर घडवत आहेत. सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, अमेरिका, न्यूझीलंड यासह इतर अनेक देशांत ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. मॉरिशसमधील शांग्रीला हॉटेल, जर्मनीतील रिटलबर्ग हॉटेल, मलेशियातील हिल्टन, चीनमधील इंडियन किचन स्पाईसेस लिमिटेड, सिंगापूरमधील द रिजंट, अमेरिकेतील हॉलिडे इन, फ्लोरिडामधील रिनाइसन्स, पटायातील सन सिटी, सिंगापूरमधील मेरियट यांसारख्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. तसेच अनेकांनी आपला स्वतःचा व्यवसायही सुरु केला आहे.”
 
‘एससीएचएमटीटी’ने २०२१ मध्ये ‘सूर्यदत्त महा मिसळ’ उपक्रमातून सात तासात ३० व्यक्तींच्या मदतीने सात हजार किलो मिसळ बनवून तीन तासात ३०० सामाजिक ३० हजार लोकांना ती मिसळ वाटण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला आहे. याबरोबरच ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी सलग २४ तास प्रबोधनासाठी लेखन, वाचन, विचार करणे, शिकणे, मौन पाळणे, नवकल्पनांचे आविष्कार, संशोधन व इनोव्हेशन असा एकत्रित उपक्रम केला असून, त्याचीही नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
 
संजीव कपूर यांनी उपस्थित तरुण शेफना मार्गदर्शन केले. आयुष्यातील चढ-उताराना सकारात्मकपणे घेत उत्तम ग्राहकसेवा देण्याचा सल्ला त्यांनी दिला. चेहरा सदैव हसतमुख ठेवून काम केले, तर येणाऱ्या अडचणींचा सहज सामना करता येतो, असे त्यांनी नमूद केले.
 
 

 

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *