आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘योधी ॲकेडमी’च्या विद्यार्थ्यांचे यश

आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘योधी ॲकेडमी’च्या विद्यार्थ्यांचे यश

पुणे : दक्षिण कोरियातील ‘तायक्वांदोवांन’ येथे नुकत्याच झालेल्या १६ व्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील योधी तायक्वांदो ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करत भारत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १० देशांतून साधारण ३००० स्पर्धकांच्या या मांदियाळीत योधी तायक्वांदो ॲकेडमीमधील खेळाडूंनी क्योरूगी (फाईट) आणि पुमसे स्पर्धेत पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि नऊ कांस्य अशा एकूण २० पदकांची कमाई केली.

 

योधी तायक्वांदो ॲकेडमीचे संस्थापक आणि मास्टर राजेश पुजारी (५ डॅन ब्लॅक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा जोगळेकर – दोन सुवर्ण पदक (क्योरूगी व पुमसे), रमा चिडगोपकर – सुवर्ण पदक (क्योरूगी) आणि कांस्य पदक (पुमसे), शिबानी मेंगाळे – रौप्य पदक ( क्योरूगी) सुवर्ण पदक (पुमसे), काव्या सोमण – रौप्य पदक (क्योरूगी) रौप्य पदक (पुमसे), सम्यक लाहोटी – कांस्य पदक (क्योरूगी) कांस्य पदक (पुमसे), श्लोक साठे – कांस्य पदक (क्योरूगी)  रौप्य पदक (पुमसे), निशांत कुलकर्णी – रौप्य पदक (क्योरूगी) कांस्य पदक (पुमसे), शर्व परांजपे – कांस्य पदक(क्योरूगी) कांस्य पदक (पुमसे), सई दहितुले – रौप्य पदक(क्योरूगी) कांस्य पदक(पुमसे), राजस कडुसकर – सुवर्ण पदक (क्योरूगी) कांस्य पदक(पुमसे) यांनी पदके मिळवली.

मास्टर राजेश पुजारी यांच्या योधी तायक्वांदो ॲकेडमीच्या पुण्यातील १५ शाखांमधे ३०० विद्यार्थी आजमितीस प्रशिक्षण घेत आहेत. दक्षिण कोरियातील तायक्वांदोचे हेड क्वार्टरशी सलग ३५ वर्षे संलग्न असलेले ग्रॅन्ड मास्टर चंद्रकांत भोसले (७ डॅन ब्लॅक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी योधी तायक्वांदो ॲकेडमीच्या सुवर्णा जोगळेकर यांना मिळाली होती. वयाच्या ४२ व्या वर्षी ही जोगळेकर यांची दोन्ही स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करत, खेळाला वय नाही, तर स्वतःला तरुण आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ हा आवश्यक असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *