स्मारकावरून वाद थांबवा!

स्मारकावरून वाद थांबवा!

हृदयनाथ मंगेशकर यांची विनंती

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारावे, अशी आमची इच्छाच नाही. त्यामुळे स्मारकावरून राजकारण थांबवा, अशी विनंती संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन होते. मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याचा संदेश सरकारी यंत्रणांना मिळाल्यानंतर नियोजनात बदल करण्यात आला. त्यानुसार अंत्यदर्शनानंतर लताबाईच्या पार्थिवावर शिवाजी पार्कवरच अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसऱ्याच दिवशी सोमवारी भाजपने शिवाजी पार्कवर लताबाईंचे स्मारक उभारण्याची मागणी केली. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी तिथे स्मारक उभारण्यास विरोध दर्शवला. हा स्मारकवाद लक्षात घेऊन लताबाईंचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मंगेशकर कुटुंबियांची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. लता मंगेशकर यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण माली आहे. ती पोकळी नवकाशाएवढी मोठी आहे. अनेक गाजरी ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. या वादात मंगेशकर कुटुंबीय कधीच सहभागी झाले नाही. कारण तशी मंगेशकर कुटुंबीयांची इच्छाच नाही. त्यामुळे स्मारकावरून सुरू असलेला वाद थांबवावा. लता मंगेशकर यांच्याबाबतीत सुरू असलेले राजकारण बंद करावे, अशी विनंती हृदयनाथ मंगेशकर यांनी केली.

राज्य सरकारने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. ती विनंती स्वतः लता मंगेशकर यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ती आनंदाने मान्य केली होती. त्याची पूर्वतयारी त्यांनी केली आहे. संगीत स्मारक होत आहे. त्यापेक्षा अन्य मोठे स्मारक होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *