महर्षीनगरमध्ये मोफत ‘आधार’,’युनिव्हर्सल’ स्मार्ट कार्ड अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महर्षीनगरमध्ये मोफत ‘आधार’,’युनिव्हर्सल’ स्मार्ट कार्ड अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांचा पुढाकार

पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या पुढाकारातून महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित मोफत आधार कार्ड स्मार्ट कार्ड बनवने, युनिवर्सल पास काढून देणे व स्मार्ट कार्ड बनवून देण्याच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात ६३० आधार कार्ड, तर ९८० युनिव्हर्सल पासचे स्मार्ट कार्ड वाटण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या हस्ते या स्मार्ट कार्डचे वाटप झाले.

अभय छाजेड म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भावनेतून पुष्कर प्रसाद आबनावे या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहेत. गरजूना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मुलींच्या सुरक्षेसाठी सुकन्या समृद्धी योजना, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार नोंदणी अभियान यांसारखे उपक्रम समाजाच्या हिताचे आहेत. लोकांना आवश्यक ती कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यास मदत होईल.”

पुष्कर प्रसाद आबनावे म्हणाले, “नागरिकांना कागदपत्रे काढणे सोयीचे व्हावे, यासाठी परिसरात विविध अभियानाचे आयोजन केले जात आहे. या अभियानांना युवक, महिला, पुरुष, अबालवृद्ध अशा सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक भावनेतून समाज कार्य करताना कायमच आनंद मिळतो.” शांताराम पोमण, राजेश लोहोकरे, तन्मय पोमण यांनी मंडळाच्या वतीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *