पुणे– मध्यप्रदेश (Madhya Pradesh) सरकारचा अत्यंत सन्मानाचा ‘राष्ट्रीय नानाजी देशमुख सन्मान पुरस्कार’ (Nanasaheb Deshmukh Award) गुरुदेव विद्यावाच्यस्पती शंकर अभ्यंकरांना (Shankar Abhyankar) प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Sinh Chauhan) आणि राज्यपाल (Governor) मंगुभाई पटेल यांच्या हस्ते गुरुदेवांना सन्मानित केले गेले. शाल, श्रीफळ, गौरवपत्र व दोन लक्ष रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारतीय ज्ञान परंपरा विस्तारासाठी विद्यावाच्यस्पती (Vidyavachaspati) शंकर अभ्यंकर यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्याबद्दल त्यांचा ‘राष्ट्रीय नानाजी देशमुख सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवादिवशी (75 Independence Day) हा सन्मान सोहळा पार पडला.
मध्यप्रदेश शासनाच्या संस्कृती विभागाद्वारे सामजिक, सांस्कृतिक, अध्यात्म, परंपरा, सामाजिक विकास इ. क्षेत्रात भरीव व विशेष कार्य करण्यार्या व्यक्ती अथवा संस्था यांना उत्कृष्ठ नवनिर्मिती, दीर्घ अभ्यास, समग्र रचनात्मक साहित्य इ. निकषांच्या आधारे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन्मान प्रदान करतेवेळी ती व्यक्ती अथवा संस्था पुर्णपणे त्या क्षेत्रात सक्रीय असणे गरजेचे असते.