दुसरी राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रा १९, २० मार्चला पुण्यात

दुसरी राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रा १९, २० मार्चला पुण्यात

एमएसएमई मंत्रालय व एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युरशिप फोरमतर्फे आयोजन; ‘आयपी’चे महत्व होणार अधोरेखित 

पुणे : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्यातर्फे दोन दिवसीय दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी-आयपी राईट्स) यात्रेचे आयोजन १९ व २० मार्च २०२५ रोजी हॉटेल लेमन ट्री प्रीमिअर, पुणे येथे करण्यात आल्याची माहिती ‘एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल यांनी दिली आहे.

भारत सरकारने बौद्धिक संपदा कायद्याबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट्स, डिझाईन आणि जीआय आदी बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती, सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन, कल्पना आणि इनोव्हेशनचे संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान अंतर्भूत करून एमएसएमई सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या बौद्धिक संपदेची नोंद करण्यास सहकार्य करण्याचे ध्येय या उपक्रमाचे आहे. एमएसएमईना देशभरातील आयपी फॅसिलिटेशन सेंटरशी जोडण्याचे काम होत असून, इनोव्हेटर्सना क्रिएटिव्ह कामाचे प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी आणि सहाय्य पुरवले जात आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटरमार्फत (आयपीएफसी) मोफत आयपी सेवा पुरवल्या जात असून, एआयसी पिनॅकल हे अधिकृत ‘आयपीएफसी’ केंद्र आहे.

एमएसएमई, उद्योजक, आयपी तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि कायदेशीर व्यावसायिक यांना जागतिक स्तरावर आयपी संरक्षण, मार्केटमधील संधी, तंत्रज्ञान आदानप्रदान आणि आयपीचे व्यावसायिकी धोरण जाणून घेण्यासाठी व्यासपीठ देण्याचा आयपी यात्रेचा उद्देश आहे. एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यासायिक, विधिज्ञ, यशस्वी स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत. मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा, नेटवर्किंग सत्रांतून आयपीचे महत्व अधोरेखित होणार आहे. आयपी क्लिनिकच्या मार्फत यात्रेदरम्यान एमएसएमईना आर्थिक साहाय्य, आयपी नोंदणी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

पूर्णतः विनामूल्य असलेल्या या आयपी यात्रेत एमएसएमई उद्योजक, आयपीआर प्रोफेशनल्स, डिझाईन प्रोफेशनल्स, स्टार्टअप, विधिज्ञ, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. इच्छूकांनी आपली विनामूल्य नावनोंदणी www.aic-pinnacle.org किंवा ९९२१५६१९८१/९३०७३०५१८१ या व्हाट्सअप नंबर करावी.
———————————-
यंदाच्या आयपी यात्रेची वैशिष्ट्ये:
– भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) तज्ञांसोबत चर्चासत्र
– आयपी कमर्शियलायझेशन आणि आंतरराष्ट्रीय पेटंटवरील कार्यशाळा, चर्चासत्र
– ‘एमएसएमई’नामोफत आयपी नोंदणीसाठी आयपी सुविधा केंद्र
– उद्योग क्षेत्रातील प्रमुख व विचारवंतांशी नेटवर्किंगची संधी

– टेक्नॉलॉजी ट्रानस्फरवर चर्चासत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *