पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी पुणे जिल्हा व बावधन येथील विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नगरसेवक किरण दगडे पाटील व पेरिविंकल इंग्लिश मिडीयमचे चेअरमन राजेंद्र बांदल, ‘रिपाइं’ युवक आघाडी पुणे जिल्हाचे अध्यक्ष उमेश कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रसंगी कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष जितेश दामोदरे, उज्वला हवाले, भारत भोसले, बावधन गावच्या माजी सरपंच वैशाली कांबळे उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून, या देशातील कोट्यावधी श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे, असे सांगून आपल्या साहित्यातून व लेखणीतून समाजाचे वास्तववादी चित्र मांडणारे व दिड दिवसांच्या शालेय जीवनातुन कथा कादंबरी व साहित्याच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे काम अण्णाभाऊंनी केल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले.
जयंतीनिमित्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बावधनमधील बेरोजगार युवक-युवतीसाठी स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी, अनेक कारणांनी शाळा व कॉलेज सोडलेले विद्यार्थ्यांना ड्रायव्हरचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मोफत फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देऊन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोफत ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येणार आहे, असे संयोजकांनी सांगितले.
कोथरूड ब्लॉक काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्ता जाधव, हरिभाऊ जाधव, रेश्मा केदारी, जना कोकणे, वैभव कानडे, बाळासाहेब कंकाळ, सुभाष बर्डे, दत्ता गजभारे, मुकेश पात्रे, उमेश वावळे, कृष्णा शिंदे, राज बर्डे, विवेक गजबर, नामदेव क्षीरसागर, आनंद गायकवाड, सुमित गायकवाड, विठ्ठल शिंदे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उमेश कांबळे, विठ्ठल गायकवाड यांनी केले होते.