सिंगापूर मधील ग्रेस लेडीज अकॅडमीतर्फे रिता शेटीया यांना मानद  डॉक्टरेट  पदवी प्रदान

सिंगापूर मधील ग्रेस लेडीज अकॅडमीतर्फे रिता शेटीया यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

सिंगापूर मधील ग्रेस लेडीज अकॅडमी या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे रिता इंडिया फाऊंडेशनच्या संस्थपिका रिता शेटीया यांना सामाजिक कार्यासाठी (social work) ऑनरेबल डॉक्टरेट (मानद विद्यावाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली .

रिता मदनलाल शेटीया या गेल्या १५ वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी आहेत. रिता इंडिया फाऊंडेशनच्या अंतर्गत कोरोना काळातही त्यांनी कामगार , कर्मचारी , अनाथ, अंध, ट्रान्सजंडरवर्गाला १५०० पेक्षा अधिक अन्नधान्य किटचे वाटप , ५०० पेक्षा जास्त सॅनिटायझर वाटप आणि मेडिकल किटचे वाटप दात्यांच्या मदतीने केले.

याच काळात वैद्यकीय मदत आणि वैद्यकीय उपचारासाठी लागणारे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी निधी उभारण्याचे काम ही त्यांनी केले . रिता इंडिया फाऊंडेशनच्या अंतर्गत वृक्षारोपण, क्लॉथ कलेक्शन ड्राईव्ह, जॉय ऑफ गिविंग, जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी घेतले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आढावा घेऊनच ग्रेस लेडीज च्या संस्थापिका सोना पांडे यांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करत त्यांना या संस्थेच्या राजदूत या पदासाठी त्यांची नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.