रांगोळी, पथनाट्य, पदयात्रेतून ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांकडून  जागतिक एड्स दिनानिमित्त बावधन परिसरात जनजागृती

रांगोळी, पथनाट्य, पदयात्रेतून ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांकडून जागतिक एड्स दिनानिमित्त बावधन परिसरात जनजागृती

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; जागतिक एड्स दिनानिमित्त बावधन परिसरात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
 

पुणे : जागतिक एड्स दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप इन्स्टिट्यूट्समध्ये भव्य रांगोळीतून एड्स जनजागृतीचे सांकेतिक चिन्ह साकारण्यात आले. ५० फूट बाय ५० एवढ्या मोठ्या आकाराची रांगोळी अवघ्या तीस मिनिटांत रेखाटण्याचा विक्रम नोंदवला गेला. या विक्रमी उपक्रमात ‘सूर्यदत्त’च्या बॅचलर ऑफ फिजिओथेरपीच्या ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सकाळच्या वेळेत बावधन परिसरात एड्स जागृती पदयात्रा काढली. ‘संघर्ष और सहयोग-एड्स की कहाणी’ या पथनानाट्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. 

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली बॅचलर ऑफ फिजिओथेरपीच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जागतिक एड्स दिनाचे प्रतीक असलेले रेड रिबीन रांगोळीत साकारले. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर आणि सहायक प्राध्यापक डॉ. अंजली शर्मा यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहयोगी उपाध्यक्षा प्रा. स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया, रोहित संचेती यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
एकाच दिवसात तीन उपक्रम केल्याबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. म्हणाले की, “रॅली, पथनाट्य आणि एड्सच्या प्रतीकाची सर्वात मोठी रांगोळी हे एड्सबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठीचे उपक्रम आहेत. अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा एक प्रकारे तरुणांना संदेश देणारा आहे. रेड रिबीन हे एचआयव्ही एड्सच्या जागृती आणि एचआयव्ही पीडित समुदायांना आधार देण्याचे, तसेच एकात्मतेचे प्रतीक आहे. ‘लेट कम्युनिटीज लीड’ ही यंदाच्या जागतिक एड्स दिनाची संकल्पना आहे. विद्यार्थी हा समाजाचा प्रमुख भाग असून, विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्यामार्फत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम या संकल्पनेला पूरक आहे. 
 
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची स्थापना २०२१ मध्ये झाली असून, हे महाविद्यालय नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित आहे. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अंतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने नेहमीच सामाजिक जनजागृती कार्यक्रमात, तसेच समाजातील गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य व मार्गदर्शन देण्यात पुढाकार घेतला आहे. आजवर कर्करोग जागृती शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप शिबीर आदी उपक्रम सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्टच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत.
 
दर्जेदार शिक्षण व त्याला अवांतर उपक्रमांची जोड यातून विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला व कल्पकतेला प्रोत्साहन मिळते आणि त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, यावर सूर्यदत्त ग्रुपचा विश्वास आहे. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी शिकण्याच्या अनेक संधी मिळाल्या असून, त्याचा उपयोग त्यांच्या एकंदरीत प्रगतीमध्ये झालेला आहे. सूर्यदत्त सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून, त्याची राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अनेक विक्रमांमध्ये नोंद होत आहे. यापूर्वी ‘सूर्यदत्त’ने ‘ट्वेन्टी फॉर अवर्स सायलेंट व्हीरीडेथॉन’ ज्यामध्ये शांततेचे निरीक्षण करत वाचन, लेखन, शिकणे, विचार करणे असा विक्रम प्रस्थापित केला होता. ‘अनफोल्ड द ब्लाइंडफोल्ड’ या विक्रम अंध व्यक्तींना येणाऱ्या आव्हानांचा अनुभव घेत नेत्रदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. सलग २५ तास देशभक्तीपर गायनाचा ‘काव्याथॉन’ हा उपक्रम घेण्यात आला. ८००० किलो गरम, ताजी व पौष्टिक पुणेरी मिसळ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४० हजार लोकांना वाटण्याचा ‘महामिसळ’ हा उपक्रम विक्रमी झाला होता. स्वरांवर आधारित सर्वात जास्त वेळ योग करण्याचा ‘कलाआरोग्यम योगाथॉन’ या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच ‘तालआरोग्यम योगाथॉन’मध्ये तालावर आधारित सर्वाधिक वेळ योग करण्याचा विक्रम ‘सूर्यदत्त’च्या नावावर नोंदवला गेला आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *