“स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” चे बक्षीस वितरण समारंभ

“स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” चे बक्षीस वितरण समारंभ

“आझादी का अमृत महोत्सव” निमित्ताने चालू असलेल्या कार्यक्रमांतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. च्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टीम (एचएमआयएस) प्रकल्पांतर्गत “स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” चे इंटरनॅशनल इन्स्टिटयुट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी हिंजवडी येथे दि. १३ व १४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिका, मे. ओयासिस सायबर नेटीक्स प्रा.लि. चेन्नई, आय ईईई ईएमबीएस पुणे चॅप्टर, आय ईईई एमआयटी विदयार्थी शाखा, व्हीआयआयटी पुणे व भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. च्या वतीने आयोजित “स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” तामिळनाडू येथील श्रीकृष्ण अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील एडीएक्समार्क संघाने “ॲटोमॅटींग डेटा एन्ट्री आणि प्रेडीक्शन” प्रकारात स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक देताना पुणे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भारती प्रथम क्रमांकाचे बक्षीस वितरण करताना.

“स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” चे उदघाटन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. आशिष बनगिनवार, स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, व्यवस्थापकीय विश्वस्थ अमृता कटारा, व्हीआयआयटी पुणेचे संचालक डॉ. विवेक देशपांडे, एमआयटीएडीटी युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा डॉ. रजनीशकौर सचदेव, पीडब्ल्येसीचे सहयोगी संचालक तन्मय साहा आदी मान्यवर उपस्थित होते.

“स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” या स्पर्धेसाठी भारतातून सुमारे १४० विद्यार्थी संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामधून उपांत्यफेरीत ३० संघांची निवड स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३ साठी करण्यात आली. प्रत्येक संघाने आरोग्याशी संबंधीत समस्यांवर त्यांचे स्वत:चे अनोखे आणि सर्जनशील उपाय सादर केले. या कल्पनांना वैद्यकीय पायाभूत सुविधांना नविन तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. यामुळे आरोग्य यंत्रना अधिक गतिमान होवून आरोग्य सुविधेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल.
“स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” हा आरोग्याशी संबंधीत समस्यांवर नवनवीन उपाय शोधण्याची भारतीतील तरुणांची क्षमता दर्शविण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्टार्टपमधून प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम भारताच्या जी-२० अध्यक्षांच्या अंतर्गत व अर्बन-२० (U20) कार्यक्रमांतर्गत किक स्टार्ट कार्यक्रम होता.

“स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” मध्ये ‍तामिळनाडू येथील श्रीकृष्ण अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील एडीएक्समार्क संघाने “ॲटोमॅटींग डेटा एन्ट्री आणि प्रेडीक्शन” प्रकारात स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रक्कम रु. ७५ हजार असे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकवले. याच महाविद्यालयातील टायडप संघाने “वैयक्तिकृत पेशंट केअर” या प्रकारात स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रक्कम रु. ५० हजार असे व्दितीय क्रमांक, तसेच पुणे येथील पीआयसीटी इनव्हिक्टस संघाने “इन्प्रूव्हींग हेल्थकेअर डीलेव्हरी” प्रकारात स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रक्कम रु. २५ हजार असे तृतीय क्रमांक बक्षीस पटकवले. तसेच स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३ मध्ये सहभागी विद्यार्थी संघातील एकूण ५ संघास प्रत्येकी रक्कम रू. १० हजाराचे “विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार” जाहीर करण्यात आले. संघाचे नाव हेल्थ आयक्यू :- वैयक्तिक रुग्ण सुशृषा, बिलिव्हर्स :- स्वयंचलित डेटा एट्री आणि प्रोसेसिंग, डेव्हगीक्स :- रुग्ण प्रतीबध्दता वाढ, डी ११ :- हेल्थ केअर डेटा मॅनेजमेंट इम्प्रोव्हमेंट आणि ग्रेमॅटर :- भविष्यसुचक विश्लेषण या विभागात वरील संघ विजेते ठरले.

“स्मार्ट पुणे हेल्थ हॅकाथॉन २०२३” चे बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भारती, मे. ओयासीस सायबरनेटीक्स प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक एझिल वलवान, आयईईई इएमबीएस पुणे चॅप्टर डॉ. अरुण जामकर, पुणे महानगरपालिकेचे माहिती व तंत्रज्ञान प्रमुख राहुल जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील, तसेच प्रा. एम.जे. खुर्जेकर हे उपस्थित होते.
इंटरनॅशनल इन्स्टिटयुट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. वैशाली पाटील यांनी सर्व मान्यवरांचे व सहभागी विद्यार्थी संघांचे अभिनंदन केले. शेवटी प्रा.डॉ. ज्योती सुर्वे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *