पुणे : जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार पुण्यातील पत्रकार प्रतिक गंगणे यांना प्रदान करण्यात आला. सासवड येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार देऊन गंगणे यांना सन्मानित करण्यात आले. सासवड येथील जयदीप मंगल कार्यालयात जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय १३ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन पार पडले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गुलाब वाघमोडे व राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भा. ल. ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते, सोनाली यादव, पुणे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे उत्तम कामठेर, गौरव कोलते, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्रीकांत ताम्हणे, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष संजय जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, पुरंदर तालुका सेवादल अध्यक्ष रामभाऊ काळे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचेसह अनेक साहित्यिक, लेखक, कवी व नागरिक उपस्थित होते.