पुणे: प्रेम म्हणजे काय? जगण्यासाठी जडून घ्यावा लागतो असा छंद .अशा शब्दात ज्येष्ठ कवियत्री हेमा लेले यांनी रंगत-संगत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कवी संमेलनाची सुरुवात केली.प्रेमदिना निम्मित रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रेम या विषयावरचे कवी संमेलन पत्रकार भवन येथे पार पडले यावेळी एडवोकेट प्रमोद आडकर मैथीली आडकर हेमा लेले ,शिल्पा देशपांडे उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेत्री हेमा लेले यांनी भूषवले. संयोजन आणि समन्वय प्रभा सोनवणे यांनी केला. कवी संमेलनाची सुरुवात एकापेक्षा एक अशा बहारदार कवितांनी झाली. . प्रेम गजऱ्याची ची भाषा, प्रेम तळहाताची रेषा या विजय सातपुते यांच्या ओळी तसंच मनातली ती ,असाच रोज भेटशील तू चांदण्यात पुन्हा अशा एकापेक्षा एक सरस अशा कवितांनी संमेलन बहरत गेले यावेळी स्वप्नील पोरे, डॉक्टर ज्योती रहाळकर, वर्षा कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर जोशी, डॉ मृदुला खैरनार कुलकर्णी, विजय सातपुते, सुजित कदम, निरुपमा महाजन, चारुहास दामले, नीलाक्षी महाडिक, माधव हुंडेकर यांनी कविता सादर केल्या. कर्नल बल्लेवार यांनी समारोपाच्या कवितेत वीरमरण आलेल्या सैनिकांच्या पत्नीची कविता सादर करून रसिकांना भावुक केले .प्रेमाचे विविध पैलू दाखवत संमेलनात प्रेमाचा संदेश देण्यात आला सूत्रसंचालन प्रमोद आडकर आणि शिल्पा देशपांडे यांनी केले