पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर

सरचिटणीसपदी मोकाशी, खजिनदारपदी खमितकर; उपाध्यक्षपदी शेळके, शिंदे 

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे वरिष्ठ बातमीदार पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्षपदी सकाळचे वरिष्ठ बातमीदार उमेश शेळके व महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार स्वप्नील शिंदे, सरचिटणीसपदी तरुण भारतचे सुकृत मोकाशी (बिनविरोध), तर खजिनदारपदी प्रभातच्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांची निवड झाली. २०२३-२४ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची निवडणूक रविवारी (३० जुलै) झाली.
 
चिटणीसपदी पुढारीच्या बातमीदार प्रज्ञा केळकर व राष्ट्रसंचारच्या बातमीदार पूनम काटे यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून हर्ष दुधे (महाराष्ट्र टाइम्स), वरद पाठक (महाराष्ट्र टाइम्स), विक्रांत बेंगाळे (आज का आनंद), शहाजी जाधव (सकाळ), श्रद्धा सिदीड (महाराष्ट्र टाइम्स), विनय पुराणिक (पुण्यनगरी), गणेश राख (सामना), संभाजी सोनकांबळे (लोकमत), शंकर कवडे (पुढारी), भाग्यश्री जाधव (पुढारी) यांची निवड झाली आहे. ऍड. प्रताप परदेशी, ऍड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.
 
मावळते अध्यक्ष स्वप्नील बापट यांच्याकडून पांडुरंग सांडभोर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मावळत्या कार्यकारिणीचा व नवनिर्वाचित सभासदांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दोन, खजिनदार पदासाठी दोन, तर कार्यकारिणी सदस्यासाठी १९ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे पत्रकारांमध्ये औत्सुक्याचे वातावरण होते. नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व कार्यकारिणीचे ‘उचित मीडिया अँड पीआर’च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *