पुणे: अनाथाश्रम, वंचित घटकांतील मुले-मुली व वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची खास दांडिया व महाभोंडल्याचे आयोजन केले होते. दुर्गा अष्टमीनिमित्त युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट, वंदे मातरम् संघटना, आदर्श मित्र मंडळ, युवा वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. तसेच वस्ती विभागातील मुलामुलींना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्याचे, तसेच बचपन बचाव समितीतील अनाथ मुलींना लाकडी खेळण्यांचे वाटप करण्यात आले. उपक्रमाचे यंदा १६ वे वर्षे होते.
प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे व डायमंड वॉच कंपनीचे संचालक संजीव फडतरे, वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर कार्याध्यक्ष संतोष देवकर, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरज जाधव, मार्केटयार्ड कामगार युनियन अध्यक्ष नितीन जामगे, ॲड. मनीष पाडेकर व अनिश पाडेकर उपस्थित होते. अमोल भुरेवाल, आदित्य मुगळे, किरण केकाने, तुषार गिरी, गिरीश धुमाळ, ओम जामगे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.