योगशास्त्रावर संशोधनाची विद्यापीठात संधी

योगशास्त्रावर संशोधनाची विद्यापीठात संधी

महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशनशी सामंजस्य करार

पुणे : योगासनांच्या पलीकडे जाऊन योगशास्त्रात संशोधन करण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशनशी सामंजस्य करार केला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक- संचालक डॉ. संप्रसाद विनोद यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत योगाभ्यासाशी संबंधित विविध उपक्रम, संशोधन प्रकल्प राबवले जातील. डॉ. करमळकर म्हणाले, ‘योग म्हणजे फक्त आसने किंवा सूर्यनमस्कार नाही, तर तो स्व शोधाचा एक प्रवास आहे. योगाभ्यासातून ती दिशा विद्यार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मानसशास्त्रीय अभ्यासातील संकल्पनांच्या मुळाशी जाण्यासाठी योगाभ्यास निश्चितपणे उपयुक्त ठरतो. त्यामुळे संशोधनाची आणि अभ्यासाची गरज लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. विविध मानसशास्त्रीय संकल्पना स्पष्ट होण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही हा अभ्यास उपयुक्त ठरू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *