‘आयएमए’तर्फे डॉ. कल्याण गंगवाल सन्मानित

‘आयएमए’तर्फे डॉ. कल्याण गंगवाल सन्मानित

डॉ. कल्याण गंगवाल यांचा इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे सन्मान

पुणे : पुण्यातील शाकाहार कार्यकर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने नुकतेच सन्मानित करण्यात आले. सत्कारानंतर जागतिक तंबाखू निषेध दिवसानिमित्त ‘चला तंबाखू सोडूया, पर्यावरण वाचवू या’ असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.

डॉ. गंगवाल यांनी सदाचार, शाकाहार, जीवदया, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्तीसाठी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ केलेल्या सेवाकार्याबद्दल, तसेच ४० लाख लोकांना शाकाहारी बनवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. अरुण हळबे, डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. अलका क्षीरसागर, डॉ. नितीन अभ्यंकर, डॉ. गीतांजली शर्मा आदी उपस्थित होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणले, ”शाकाहार, अहिंसा आणि जीवदया यासाठी गेली पन्नास वर्ष सातत्याने करत असलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. पर्यावरण रक्षण, ग्लोबल वार्मिंग, वाढता हिंसाचार या समस्यांसाठी केवळ अहिंसेचे आणि सद्भावाचे विचार आवश्यक आहेत. चांगल्या आरोग्यासाठी शाकाहार, व्यसनमुक्त जीवन जगले पाहिजे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *