वैद्यकीय व्यावसायिक म्हणून स्वतःची योग्यता उंचावत न्यावी

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून स्वतःची योग्यता उंचावत न्यावी

डॉ. राकेश शर्मा यांचे प्रतिपादन; निमा प्रसूती स्त्रीरोग संघटनेतर्फे ‘सुश्रृती : द वुम्ब अँड वुंड सागा’ या आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : “वैद्यकीय व्यावसायिक म्हणून स्वतःची योग्यता उंचावत न्यावी. कारण ज्ञान आपल्याला निर्भय करते आणि विवेक शिकवते,” असे प्रतिपादन नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनच्या (एनसीआयएसएम) बोर्ड ऑफ द एथिक्स अँड रजिस्ट्रेशन फाॅर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा यांनी केले.

 
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), ऑब्स्ट्रेटिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी (ओबीजीवाय), महाराष्ट्र, सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ काॅलेज ऑफ आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तीन दिवसांची ही परिषद मांजरी येथील स्वोजस पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस ८००हून अधिक वैद्यकीय व्यावसायिक सहभागी झाले होते.
 
याप्रसंगी ‘निमा’ सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, ‘ओबीजीवाय’च्या अध्यक्ष डॉ. कामिनी धीमान, डॉ.‌ एस.‌ एफ. पाटील, श्री. अनिल गुजर, श्री. अरुण गुजर, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. मंदा घोरपडे, डॉ. सुहास हेर्लेकर, डॉ. मनोज गायकवाड, डॉ. विष्णु बावणे, डॉ. प्रियंका नाकाडे, डॉ. मनोज चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक सचिव डॉ. सुजित शिंदे हे होते. डॉ. प्रशांत दळवी, डॉ. राहुल गरुडकर, डॉ. प्रदीप मुसळे, डॉ. प्रकाश दैठणकर, डॉ. उमेश लूनावत, डॉ. विवेक जोग, डॉ. हृषिकेश वाघमारे, डॉ. अमोल साबळे, डॉ. कमलाकर गजरे, डॉ. ज्योती गवळी, डॉ. तृप्ती गावडे, डॉ. रितेश दामले यांनी परिषदेच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
उद्घाटन सत्राच्या सोहळ्यात ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक, अध्यापक डॉ. पुष्पा तुळपुळे यांचा जीवनगौरव सन्मान देऊन गौरव करण्यात आला. डॉ. अर्पिता शहा लिखित ग्रंथाचे, त्याचप्रमाणे ‘सुश्रुती २०२४’ या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. डॉ.‌ कामिनी धीमान यांनी ‘ओबीजीएन’च्या कार्याची, विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. मंदा घोरपडे, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. आशुतोष कुलकर्णी यांचीही भाषणे झाली. डॉ. तुळपुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
 
डॉ.‌ राकेश शर्मा यांनी आपल्या भाषणात स्त्रीशक्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ ही आपली परंपरा आहे. स्त्रियांनी आपले कर्तृत्व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सिद्ध केले असल्याचे त्यांनी नमूद केले. 
 
डॉ. राकेश शर्मा पुढे म्हणाले, “आयुर्वेदाच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा ठेवा जपला आणि वृद्धिंगत केला पाहिजे. राज्यातील मेडिकल स्टेट अॅक्टचा अभ्यास केला पाहिजे तसेच रेग्यूलेशनची प्रत स्वतः जवळ ठेवली पाहिजे.”
 
डॉ. हेर्लेकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ.‌ अर्पिता शहा व डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विभावरी वैद्य यांनी धन्वंतरी स्तवन केले. डॉ. अजयराज बाळ व डॉ. सुचिता राजेभोसले यांनी आभार मानले. 

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *