रोटरी क्लब कोथरूड यांच्या वतीने वैद्यकीय सेवा शिबिर संपन्न

रोटरी क्लब कोथरूड यांच्या वतीने वैद्यकीय सेवा शिबिर संपन्न

पुणे : रोटरी क्लब कोथरूड, प्रहार सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन, ताराचंद हॉस्पिटल्स व एम ३ मेडिकल फाऊंडेशन यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा शिबीराचे आयोजन राजीव गांधी सहकारी वसाहत, भवानी पेठ येथे करण्यात आले होते.

यावेळी आयोजकांच्या वतीने ५ गरजू व्यक्तींना व्हील चेअर भेट स्वरूपात देण्यात आल्या.
त्याबरोबरीने ४५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ५५० नागरिकांना मोफत चष्मा वाटप व ५० नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

या उपक्रमात व्हील चेयरचे वितरण प्रेसिडेंट रो. सत्यजित चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसंत कुलकर्णी, सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर रो. मनीष दीडमिशे,पी.आय. डायरेक्टर. रो.मधुरा यळसंगीकर,समाजसेवक नवशाद शेख आणि शुभम शहा, अशोक शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते..!!

फोटो ओळी : व्हील चेयरचे वितरण करताना (डाव्या बाजूने) कोथरूड रोटरी क्लबचे मनीष दीडमिशे, मधुरा यळसंगीकर, सत्यजित चितळे, वसंत कुलकर्णी

माध्यम संपर्क : बॅनियन ट्रीज सोल्यूशन्स, हर्षल देशपांडे, ९८५०५७७५५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *