पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे मंगेश कोळपकर

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे मंगेश कोळपकर

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे प्रिंसिपल कॉरस्पाॅडंट मंगेश कोळपकर यांची बिनविरोध निवड झाली. तर सरचिटणीसपदी डॉ. सुजित तांबडे (महाराष्ट्र टाइम्स) आणि खजिनदारपदी नीलेश राऊत (लोकमत) यांची निवड झाली आहे.
नवनियुक्त कार्यकारिणीने शुक्रवारी (ता. ९) कार्यभार स्वीकारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पत्रकार संघातर्फे सर्व इच्छुक उमेदवारांना निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सर्व सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

निवडणूक प्रक्रियेसाठी अॅड. प्रताप परदेशी व अॅड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवड झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष सुदीप डांगे (सामना), विकी कांबळे (झी २४ तास), चिटणीस प्रसाद पाठक (आज का आनंद), दिलीप तायडे (केसरी).

कार्यकारिणी सदस्य : सनील गाडेकर (सकाळ), गणेश आंग्रे व संदीप घोडके (प्रभात), प्रशांत चव्हाण (बेळगाव तरुण भारत), अस्मिता चितळे (महाराष्ट्र टाइम्स), चंद्रकांत फुंदे (न्यूज १८ लोकमत), मंगेश देशमुख व प्रसाद जगताप (पुढारी), रूपेश कोळस (केसरी), अभिजित कोळपे (लोकमत), नवनाथ शिंदे (सामना ), गणेश वाघमोडे (पुण्यनगरी), राहुल देशमुख (पुणे मिरर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *