पुणे : तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे कालीपुत्र कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांची जाहीर हिंदू धर्मजागरण सभा (Hindu) आयोजित करण्यात आली आहे. येत्या शनिवारी (दि. ११ मार्च) सायंकाळी ७.०० वाजता सनसिटी रस्ता, भाजी मंडई शेजारी, सिंहगड रस्ता, पुणे येथे हिंदू समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी ही हिंदु धर्मजागरण सभा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे (Dipak Nagpure) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक, शिवशंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, (Neelesh Bhise) सदस्य मंगेश बुजवे, सुनील भगरे, विक्रांत ढवळे उपस्थित होते.
नीलेश भिसे म्हणाले, “या सभेचे आकर्षण म्हणजे श्रद्धेय कालीपुत्र कालीचरण महाराज त्यांच्या खड्या आवाजात शिवतांडव स्तोत्र (Shivtandav Strotra) म्हणणार आहेत. या सभेसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा
