उल्लेखनीय कार्यासाठी जावेद इनामदार यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

उल्लेखनीय कार्यासाठी जावेद इनामदार यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान

पुणे : युवकांच्या संघटन कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद इनामदार यांना ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत २२ राज्यांतून युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. देशभरातून केवळ १० पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जावेद इनामदार यांनी केले.

जावेद इनामदार वयाच्या १७ व्या वर्षांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. महाविद्यालयासह शहरातील इतर प्रश्नावर आंदोलन, संघटन व अन्य सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत २०१९ मध्ये त्यांना शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली.

देशातील २२ राज्यांत राष्ट्रवादी पक्ष विस्ताराला असून, प्रत्येक राज्याचा दौरा करत इनामदार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याची दखल घेत शरद पवार साहेब व धीरज भैया शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व राज्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्याध्यक्ष उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *