सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झाले आहे. त्यांचा आणि माझा जवळजवळ चार दशकांच्या पेक्षाही जास्त काळ परिचय होता. अनाथ आणि निराधार मुलांचा प्रश्न अदृश्य बनवण्याच्या बरोबरच त्याबद्दल माया, ममता आणि संगोपन या क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं, स्वतःला झोकून दिले. त्यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आणि समाजाला एक चांगला संस्कार देणार होते. त्यांना पद्मश्री मिळाली आणि अनेक पुरस्कार मिळाले परंतु सिंधुताईंचे साधे वागणं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून घेणे हे कायम तसंच राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि भारतामधील सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या सावित्रीच्या लेकीला आम्ही हरवलेले ,हरपलेले आहे.
सिंधुताई यांच्या कार्याच्या समाजाने आणि शासनाने सातत्याने या प्रकारच्या कामाच्या पाठीमागे उभा राहणं आणि त्याचबरोबर अनाथ मुलांना अधिकाधिक अधिकार मिळवून देण्यासाठी आणि कल्याणासाठी काम करणं ही सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली ठरेल.
ना.डॉ.नीलम गोऱ्हे,
उपसभापती – विधानपरिषद,
महाराष्ट्र विधिमंडळ