आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२५ चा आज समारोप, २५ मान्यवरांना सन्मान

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२५ चा आज समारोप, २५ मान्यवरांना सन्मान

पुणे : आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२५ चा आज समारोप उत्साहात झाला. या फेस्टिवलची सुरुवात फुलेप्रेमी रंजना गायकवाड, राधिका जाधव आणि दुर्गा राऊत यांच्या गझल आणि कवितांनी रंगतदार केली.

कार्यक्रमात जोतिबा फुलेंच्या कार्याचे महत्व विशद करण्यात आले. फुलेप्रेमींनी त्यांच्या विचारांवर भाष्य करत, “जोतिबांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली आणि समाजात स्वाभिमाने जगण्याचा अधिकार दिला,” असे सांगितले. जोतिबांच्या या विचारांनी समाजाला योग्य दिशा दिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

विजय वाडवेराव: यांनी आपल्या मनोगतात, “अध्यक्ष पदासाठी कित्येकांनी कटकारस्थाने केली, पण आम्ही स्वाभिमानासाठी लढत राहिलो. या फेस्टिवलच्या माध्यमातून फुलेंच्या कार्यकिर्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा उजाळा मिळत आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमात क्रांती वेंदे, पूनम पाटील, कांचन मून यांच्यासह एकूण २५ मान्यवरांना ‘आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या फेस्टिवलने फुलेंच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य साध्य केले असून, तो एक आदर्श ठरला आहे.