जागतिक योग दिनानानिमित्त ‘सूर्यदत्ता’मध्ये ‘कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’चे आयोजन

जागतिक योग दिनानानिमित्त ‘सूर्यदत्ता’मध्ये ‘कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’चे आयोजन

पुणे : जागतिक योग दिनानिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या (एसएफएसए) वतीने शरीराच्या आणि मनाच्या सर्वांगीण विकासासाठी तालबद्ध असलेला एकविसाव्या शतकातील अद्वितीय विश्वविक्रमी उपक्रम अर्थात ‘कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’ या वैशिष्ट्यपूर्ण आर्टिस्टिक योगाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीपर गीतांच्या तालावर आधारित सलग दोन तास (Longest duration Yoga) विविध आसनांच्या माध्यमातून योग केला जाणार असून, त्यातून कलेचा आणि आरोग्याचा अनोखा मिलाप पाहायला मिळणार आहे.
 
या ‘कलाआरोग्यम् योगाथॉन’ची दखल विविध बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली जाणार आहे. सोमवार, दि. २१ जून २०२१ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत ‘सूर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये ‘योगाथॉन’ होणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी दिली. यासाठी योग आणि शारीरिक तंदुरुस्ती क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ज्युरी म्हणून येणार आहेत. तसेच नामवंत खेळाडू आणि योगाचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा विश्वविक्रमी उपक्रम https://facebook.com/SuryadattaGroupofInstitutes/ किंवा https://youtube.com/channel/UCbq-YMGHVcradX1zwhpaURA या संकेतस्थळावरून लाईव्ह पाहता येईल, असेही डॉ. चोरडिया यांनी सांगितले.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “योगाच्या मदतीने मन व शरीर, आचार-विचार, कृती, संयम, सकारात्मक भावना आदी गोष्टींचा समतोल साधला जातो. योग मानवाला निसर्गाशी एकरूप व्हायला लावतो. योगसाधनेमुळे शारीरिक व्यायामासह मानसिक आणि भावनिक कक्षा विकसित होतात. योग म्हणजे कलेचा, क्रयशीलतेचा, नावीन्यतेचा, उपक्रमशीलतेचा, सकारात्मक विचारांचा स्रोत आहे. गाण्यांच्या तालावर आधारित या आर्टिस्टिक योगाची तयारी महिन्याभरापासून सुरु आहे. शिक्षक-शिक्षकेतर सर्वच कर्मचारी यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. एकूण १०० लोक सलग दोन तास कलेच्या सादरीकरणातून योग करणार आहेत. ही एक विश्वविक्रमी नोंद होणार आहे.”
———————————————
‘स्टार्ट फेस्ट’मधून उद्योजकतेला प्रोत्साहन
सूर्यदत्ता शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व स्टाफने कोरोना काळात सकारात्मक विचारातून साकारलेल्या स्टार्टअपचा महोत्सवही सोमवारी (दि. २१ जून) आयोजिला आहे. जवळपास ३० स्टार्टअप या फेस्टमध्ये प्रदर्शित होणार आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान व उद्योजकता या क्षेत्रातील विविध मान्यवर या फेस्टला उपस्थित राहणार असून, उत्कृष्ट स्टार्टअप सन्मानित केले जाणार आहेत.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *