दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘आर. बी. होरांगी’च्या खेळाडूंना १८ सुवर्ण व ४ रौप्य

दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘आर. बी. होरांगी’च्या खेळाडूंना १८ सुवर्ण व ४ रौप्य

पुणे : दक्षिण कोरिया येथे नुकत्याच झालेल्या १६ व्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील आर. बी. होरांगी तायक्वांदो दो जंग असोसिएशनच्या खेळाडूंनी क्योरुगी आणि पूमसे श्रेणींमध्ये १८ सुवर्ण, चार रौप्य आणि १५ कांस्य पदकांची कमाई केली. दक्षिण कोरियातील मुजू-गन येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, भारत, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फिलीपिन्स, ब्राझील, नेपाळ, पाकिस्तान, इस्रायल, इंडोनेशिया, बांगलादेश इत्यादी विविध देशांतील तीन हजारांपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
 

आर. बी होरांगी तायक्वांदो दो जंग असोसिएशनच्या संघात पुण्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी ठिकाणच्या खेळाडूंचा समावेश होता. सर्वेश श्रीनिवास केडगोनी (पूमसे), क्रिश केडगोनी (क्योरुगी), तेजस्विनी कांगडे (क्योरुगी), सुमेधा साखरे, (पुमसे), विराज बिरंजे (क्योरुगी), तृप्ती परदेशी (क्योरुगी), गायत्री कटके (क्योरुगी), प्रकाश प्रजापती (क्योरुगी), प्रशांत रामुगडे (क्योरुगी), श्वेता थिगाला (क्योरुगी), दीपक कृष्णा (क्योरुगी), शद्रच आर.व्ही (क्योरुगी), सानिका काळे (पुमसे), ऋग्वेद नलावडे (पुमसे), जान्हवी टिळेकर (पुमसे), कृष्णा गौड (पुमसे), तेजुनाथ चौहान (पुमसे), पवन कुमार (पुमसे) यांनी सुवर्णपदक पटकावले. वैष्णवी मुळीक (पुमसे), दृष्टी रोकडे (क्योरुगी), नंदिनी बाफना (क्योरुगी), सिद्धेश जगता (क्योरुगी) यांना रौप्य पदक मिळाले.

आर. बी. होरांगी तायक्वांदो दो जंग असोसिएशनचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर रवींद्र भंडारी यांनी सर्व सहभागींना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षक मास्टर किरण गायकवाड आणि श्रीमान परेश बाफना यांनी  संघाला मदत केली. या स्पर्धेमध्ये सेंट फिलिक्स स्कूलच्या दोन मुलींनी सहभाग घेतला होता. एका मुलीने सुवर्ण, तर दुसऱ्या मुलीने रौप्य पदक पटकावले. सेंट फिलिक्स स्कूलच्या प्राचार्य सिस्टर जेनिफर, पर्यवेक्षक सिस्टर एल्सा, लीना पॉल यांनी टीमचे व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *