प्रत्यक्ष कर संकलनात सनदी लेखापालांचे महत्वपूर्ण योगदान

प्रत्यक्ष कर संकलनात सनदी लेखापालांचे महत्वपूर्ण योगदान

 
प्रत्यक्ष कर संकलनात सनदी लेखापालांचे महत्वपूर्ण योगदान
सीए चंद्रशेखर चितळे यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’तर्फे ‘प्रत्यक्ष कर’ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
 
पुणे: “करदात्याकडून थेट सरकारच्या तिजोरीत जमा होणारा प्रत्यक्ष कर संकलित करण्यामध्ये सनदी लेखापालांचे योगदान महत्वपूर्ण आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्याचे व सक्षम करण्याचे काम त्याच्या हातून होत असते. करदात्यांना योग्य मार्गदर्शन करून प्राप्तिकर भरण्यास प्रोत्साहन देण्याचेही काम सनदी लेखापाल करत आहेत,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी केले.
 
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) डायरेक्ट टॅक्स कमिटी (डीटीसी) व आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने ‘प्रत्यक्ष कर’ विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सीए चंद्रशेखर चितळे बोलत होते. प्रसंगी ‘डीटीसी’चे चेअरमन सीए पियुष छाजेड, विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेच्या चेअरपर्सन सीए अमृता कुलकर्णी, परिषदेचे समन्वयक सीए अजिंक्य रणदिवे यांच्यासह पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए सचिन मिनियार, सचिव सीए हृषिकेश बडवे, खजिनदार सीए मोशमी शहा, कार्यकारिणी सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए प्रीतेश मुनोत, सीए प्रणव आपटे, सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.
 
दोन दिवसांच्या या राष्ट्रीय परिषदेत देशभरातून जवळपास ५०० सीए सभासद सहभागी झाले आहेत. ‘कर कायद्यातील दंड रचना’ यावर ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए निहार जांबूसरिया, ‘नॉन-रेसिडेंट टॅक्सेशन’वर आंतरराष्ट्रीय करप्रणाली तज्ज्ञ सीए नंदकिशोर हेगडे, ‘फेसलेस सीआयटी’वर सीए (डॉ.) व्ही. एल. जैन, ‘टॅक्सेशन ऑफ पार्टनरशिप फर्म’वर सीए अनिल साठे, ‘प्राप्तिकर कायदा १९६१ अंतर्गत पुनर्मूल्यांकन’वर सीए पियुष छाजेड, ‘अलीकडच्या काळातील पुणे लवादाने दिलेले निर्णय’वर सीए किशोर फडके, ‘ब्लॉक असेसमेंट संदर्भातील तरतुदी’वर डॉ. सुनील पाठक यांनी मार्गदर्शन केले.
 
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सर्व सीए योगदान देत आहेत. करसंरचनेतील बदल, तरतुदी समजाव्यात, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी सनदी लेखापालांनी काही बदल सुचवावेत, यासाठी प्रत्यक्ष कर विषयावरील ही परिषद महत्वाची आहे.”
 
सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “प्रत्यक्ष कर विषयावरील या परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत विविध विषयांवर चर्चा होते. त्यातून कर प्रणालीतील नवे बदल, तरतुदी, नियम समजतात. तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन होत असल्याने पुण्यातील परिषदांना नेहमीच प्रतिसाद मिळतो.”
 
सीए अजिंक्य रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *