आदिवासी निराधार महिलेस ‘सुदर्शन’कडून मदतीचा हात

आदिवासी निराधार महिलेस ‘सुदर्शन’कडून मदतीचा हात

रोहा : तालुक्यातील आदिवासीवाडी (कोलाड) येथील निराधार महिला सुगंधा आकाश जाधव यांना सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून सीएसआर अंतर्गत मदतीचा हात देण्यात आला आहे. सुदर्शन सीएसआर फौंडेशनच्या माध्यमातून सदर निराधार महिलेस दोन शेळ्या देण्यात आल्या आहेत. याकामी कोलाड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी ‘सुदर्शन’कडे या महिलेस मदतीसाठी शिफारस केली होती.

सुभाष जाधव यांनी सांगितले की, कोलाड परिसरातील आदिवासीवाडीतील आकाश प्रकाश जाधव यांचा फेब्रुवारीमध्ये आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती. सुगंधा आकाश जाधव यांच्यावर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. परिस्थिती हलाखीची असल्याने सुदर्शन सीएसआर फौंडेशनकडे सदर निराधार महिलेस मदतीसाठी शिफारस केली. ‘सुदर्शन’कडूनही त्याची तात्काळ दखल घेतली गेली. श्रीमती. सुगंधा आकाश जाधव यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेळी वाटप करण्यात आले. ‘सुदर्शन’च्या या सहकार्यामुळे सुगंधा जाधव यांना उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे. पुढील काळात शेळीपालनामधून मिळणाऱ्या आर्थिक उपत्पन्नातून त्यांना मुलांचे पालन पोषण करण्यास हातभार लागणार आहे. भविष्यातही जाधव यांच्या कुटुंबास सर्वतोपरी सहकार्य करू. सुदर्शनने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो.”

शेळी वाटपवेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक-रोहा किरणकुमार सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री. घायवट, सुदर्शनचे जनसंपर्क अधिकारी ऍड. विशाल घोरपडे, अॅडमिन विभागाचे रवी दिघे, सीएसआर विभागाचे रुपेश मारबते, कोलाड-महादेववाडी गावचे सरपंच सागवेकर, तसेच कोलाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. सुदर्शनच्या डेप्युटी जनरल मॅनेजर माधुरी सणस यांचे या उपक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *