लोकशाही समंजस संवाद, ‘डेमोक्रॅटिक डायलॉग’तर्फे विजय नाईक, शरणकुमार लिंबाळे यांचा गुरुवारी सत्कार

लोकशाही समंजस संवाद, ‘डेमोक्रॅटिक डायलॉग’तर्फे विजय नाईक, शरणकुमार लिंबाळे यांचा गुरुवारी सत्कार

पुणे : लोकशाहीसाठी समंजस संवाद, डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि मित्र परिवाराच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल, तसेच अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीस्थित ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय नाईक व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सरस्वती सन्मान प्राप्त साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. नाईक यांच्या पत्नी दीपा आणि लिंबाळे यांच्या पत्नी कुसुम यांनाही यावेळी गौरविण्यात येणार आहे.
 
हा सत्कार समारंभ गुरुवार, दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ लेखक, समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि जेष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ‘उचित माध्यम’च्या (https://www.facebook.com/uchitmedianews/) फेसबुक पेजवरून लाईव्ह होणार आहे, अशी माहिती ‘लोकशाही समंजस संवाद’चे संपादक अरुण खोरे यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *