चौफुला येथे पार पडला अँबुलन्स चा लोकार्पण सोहळा

चौफुला येथे पार पडला अँबुलन्स चा लोकार्पण सोहळा

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्व.तुकाराम खंडुआण्णा धायगुडे साहेब व सविताताई तुकाराम धायगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर ,गोशाळेस चारा वाटप,वृक्षारोपण,ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन,तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिका (अँबुलन्स) चे लोकार्पण सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते झाले.रमेश आप्पा थोरात,कांचंनताई कुल,आनंददादा थोरात,भाऊसाहेब करे,वासुदेव काळे या मान्यवर व स्व.साहेबांचे सहकारी बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री केसकर राजेंद्र, जयवंत पोळ इ सर्वांच्या बहुसंख्य लोकउपस्तीथीत पार पडला.

यामध्ये 252 रुग्णांनी आपल्या आरोग्यच्या विविध तपासण्यासाठी व 46 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे आयोजन स्व.तुकाराम खंडूआण्णा धायगुडे साहेब स्मृती फाऊंडेशन यांनी केले होते.ज्या रुग्णांना गरज असेल त्यांनी अँबुलन्स सेवेसाठी फाऊंडेशन ला संपर्क करावा असे अहवान फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री कैलास तात्या शेंडगे व सचिव श्री धायगुडे भाऊसाहेब यांनी फाऊंडेशन च्या सर्व सदस्य यांच्या वतीने केलेले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश गडधे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विश्वराज हॉस्पिटल,रोटरी ब्लड बँक दौंड,कैलास आबा शेलार यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *