‘नॅशनल चिकन डे’निमित्त स्वस्त दरात चिकन वितरण

‘नॅशनल चिकन डे’निमित्त स्वस्त दरात चिकन वितरण

पुणे : भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित देशव्यापी जनजागृती अभियानांतर्गत नॅशनल चिकन डे साजरा करण्यात आला. यानिमित्त शहराच्या विविध भागात १५ ते २० टक्के सवलतीत चिकन वितरित करण्यात आले. भांडारकर रस्त्यावरील फूड जंक्शन येथे पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी असोसिएशनच्या मनीषा दारवटकर, क्वालिटी पोल्ट्रीचे विनय शेट्टी, गोदरेज फुड्सचे सुशांत गोसावी आदी उपस्थित होते.
 
वसंतकुमार म्हणाले, “चिकन सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहे. त्यातून मिळणारे प्रोटीन लाभदायक असतात. आठवड्यातून पाच-सहा वेळा चिकन खाल्ले, तर आपली प्रतिकार क्षमता चांगली राहते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी चिकन खावे, यासाठी जनजागृती केली जात आहे. लोकांमध्ये चिकनबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने आज हा विविध राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दिवस साजरा होत आहे. स्वस्त दरात चिकन विक्री, जागृतीपर कार्यक्रम, प्रशिक्षण आदी उपक्रमांचे आयोजन या अभियानात केले आहे.”
 
सुशांत गोसावी म्हणाले की, चिकन आपल्या शरीरासाठी पोषक असते. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चिकन, अंडी उपयुक्त असल्याचे आपण पाहिले आहे. लोकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता चिकनचे सेवन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *