१४ हजार ८०० फूट उंचीवर अश्वारूढ छत्रपती

१४ हजार ८०० फूट उंचीवर अश्वारूढ छत्रपती

सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य भारतीय सैन्यदलाने केले आहे. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मच्छलच्या मराठा रेजिमेंटने खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे. ही मूर्ती 14 हजार 800 फूट उंचावर स्थापन करण्यात आली आहे. जगात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती एवढ्या उंचीवर बसवण्यात आली आहे. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला आहे. जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील पंचवीस वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे. तर मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी सदर मच्छल या ठिकाणी स्थापित केला आहे. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *