‘बंधुतेचा बोधीवृक्ष’ काव्यसंग्रहासाठी कविता पाठवाव्यात : प्रकाश रोकडे

‘बंधुतेचा बोधीवृक्ष’ काव्यसंग्रहासाठी कविता पाठवाव्यात : प्रकाश रोकडे

पुणे : विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमोहत्सवानिमित्त ‘बंधुतेचा बोधीवृक्ष’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. हा काव्यसंग्रह पूर्णतः स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुद्द्यांवर आधारित असेल. या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांची विशेष प्रस्तावना आहे. काव्यसंग्रहाच्या संकल्पपूर्तीसाठी साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे आणि प्रा. शंकर आथरे यांनी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

 
प्रकाश रोकडे म्हणाले, “हा काव्यसंग्रह म्हणजे संवैधानिक विचारांची पर्वणी ठरणार असून, या काव्यसंग्रहासाठी इच्छुक साहित्यिकांनी आपल्या कविता पाठवाव्यात. कविता जास्त प्रदिर्घ असू नये, तसेच ती विषयाला धरून असावी. कविता पाठवण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०२४ अशी असून, इच्छूकांनी आपल्या कविता ‘बंधुता भवन, धन्वंतरी हॉस्पिटलजवळ, जवळकरनगर, पिंपळेगुरव, पुणे-४११०६१’ या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी ९८२२८६७९०५ / ९०११३७२०२३ या नंबरवर संपर्क साधावा.”