गुणवंतांच्या पाठीवर ‘अभंग प्रभू’ची कौतुकाची थाप

गुणवंतांच्या पाठीवर ‘अभंग प्रभू’ची कौतुकाची थाप

पुणे : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ‘नीट’ (NEET) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या (Toppers) पाठीवर डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीच्या (एपीएमए)  APMA वतीने कौतुकाची थाप टाकण्यात आली. ‘एपीएमए’तर्फे नुकत्याच झालेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्टमध्ये (नीट) चांगल्या गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
 
बाणेर येथील बंतारा भवनात (Bantara Bhavan) आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सचिन तपस्वी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, बंट संघाचे अध्यक्ष संतोष शेट्टी, ‘एपीएमए’चे संचालक डॉ. अभंग प्रभू, डॉ. हिमानी तपस्वी, प्रा. सचिन हळदवणेकर, समुपदेशिका डॉ. शीतल श्रीगिरी आदी उपस्थित होते.
 
नीट‘ परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना करंडक आणि रोख रक्कम असे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी, अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, वादन असे कलाप्रकार सादर केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी नृत्यनाटिका सादर केली. विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसंगी चार विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाल्याबद्दल विशेष ट्रॉफी देण्यात आली.
 
अथक परिश्रमाची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी असेल, तर ‘नीट’ परीक्षेत यश संपादन करणे अवघड नाही. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करून त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्याला ‘एपीएमए’ प्राधान्य देते. त्यामुळेच यशाचा आलेख वाढत जातो आहे, असे ‘एपीएमए’चे संचालक डॉ. अभंग प्रभू यांनी केले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *