‘सायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंग’वर ‘एआयटी’तर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

‘सायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंग’वर ‘एआयटी’तर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

 

पुणे: सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग या विषयावर दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे  ‘एआयसीटीई अटल’ योजनेचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे. दि. २ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत एआयटी, दिघी कॅम्पस पुणे येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन एआयटी संस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे संचालन ब्रिगेडियर अभय भट करतील. डॉ. सुनील ढोरे संयोजक, तर डॉ. सागर राणे व प्रा. सीता यादव हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग क्षेत्रातील आघाडीचे उद्योगतज्ज्ञ, नामांकित शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक माहिती आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल. तसेच पुण्यातील क्विकहील कंपनीला भेट देऊन प्राध्यापकांना वास्तविक सायबर सुरक्षा पद्धतींचा अनुभव घेता येणार आहे. 

महाराष्ट्र व इतर राज्यांमधील अभियांत्रिकी प्राध्यापक, पीएचडी संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी, सरकारी कर्मचारी यांच्यासाठी हा कार्यक्रम खुला आहे. ज्ञानवाढीला प्रोत्साहन देण्यासह सायबर सुरक्षा क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांतील अंतर कमी करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. अधिक माहितीसाठी ९९७५४३६४०५ वर संपर्क साधावा, असे आवाहन ‘एआयटी’च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *