आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशन यांच्या वतीने चंदननगर-खराडी येथे नुकतीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, गुजरात मणीपूर ओडिशा बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यातील सतराशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. आर. बी. होरांगीचे १२० पेक्षा अधिक खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. स्पर्धकांना आर. बी. होरांगीचे अध्यक्ष मास्टर रवींद्र भंडारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
माजी आमदार जगदीश मुळीक, पोलीस निरीक्षक राकेश कदम, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक योगेश मुळीक, सेंट फिलिक्स शाळेच्या प्राचार्या सिस्टर जेनिफर, सिस्टर अर्सला, सिस्टर मार्था, सिस्टर एल्सा, पर्यवेक्षक लीना पॉल, पीटी शिक्षक सोनाली भोसले, रुपाली बनसोडे, माजी नगरसेविका सुनिता गलांडे, एकनाथ भंडारी, महेन्द्र भंडारी, तिरुपती भंडारी, बसवराज भंडारी या सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी योगेश मुदलियार, श्रीनिवास केदगोनी, सारंग धोका, गिरीश पाटील, वंदना बांगर राखी केदगोणी, स्वाती भंडारी, राजेंद्र सोलाखे, राजश्री गुट्टे, आशिष झा, योगेश कुलकर्णी, स्वाती खरे, नंदिनी झा, प्रशांत वांद्रे, विनोद बांगर, आरती पसारकर, प्रित वांद्रे, ब्रिजिट पाटील, संगिता कांगडे, दीपक कांगडे, शिवाजी भंडारी, गिरीश बागलकोट, सुमेधा साखरे आणि वैष्णवी वांद्रे यांनी सहकार्य केले.