पुणे : शनिवार दि ९ डिसेंबर रोजी आळंदी येथे १७ वे भव्य वारकरी महा अधिवेशन आयोजित करण्यात आले. हे अधिवेशन दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री देविदास धर्म शाळा तथा वै . मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर ,गोपाळपूर ,आळंदी येथे घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवचनकार तुणतुणे महाराज यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले, बापू महाराज रावकर, रामचंद्र महाराज पेनोरे उपस्थित होते.
ह. भ.प.रामचंद्र महाराज पेनोरे म्हणाले ,” गेली १६ वर्षे सातत्याने हे अधिवेशन घेण्यात येत असून वारकऱ्यांचे विविध प्रश्न मांडण्याचे काम हे व्यासपीठ करते. यंदाही अधोवेशनात सहभागी होणारे मान्यवर वारकर्यांना मौलिक मार्गदर्शन करणार आहे.” त्यामध्ये अमृताश्रम स्वामी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे मठाधिपती भास्करगिरी महाराज, प्रवचनकार ज्ञानेश्वर महाराज हडपे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवचनकार भागवताचार्य केशव महाराज, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान संस्थेचे प्रकाश महाराज जवंजाळ आदी सहभागी होणार आहेत.यावेळी ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे “राष्ट्रीय सुरक्षा आणि आव्हाने’ व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे “राष्ट्रासमोरील संकटे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.