पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने मुलींकरिता बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहासाठी खडकवासला येथील मते कुटुंबियांकडून १० लाखांची देणगी दिली. खडकवासला गावातील ज्येष्ठ कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ते कै. ज्ञानेश्वर लक्ष्मण मते यांच्या जन्मशताब्दी निमित्त मते कुटुंबीयाने वसतिगृहातील एका खोलीचा खर्च १० लाख रुपये दिला आहे.
शुक्रवारी मते कुटुंबाने समितीच्या आपटे वसतिगृहात भेट देऊन धनादेश समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आले. या खोलीला कै ज्ञानेश्वर लक्ष्मणराव मते यांचे नाव देण्यात येणार आहे.
रत्नाकर मते, पद्माकर मते, सुधाकर मते, कमलाकर मते, शेखर मते, सुमती भिलारे यांच्यासह मते कुटुंबातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. मते कुटुंबीयांनी समितीच्या कार्याची माहिती घेत वसतिगृहाची पाहणी केली. तसेच समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली.