एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजन
११ केद्रीय मंत्री, १० विधानसभा अध्यक्ष, ४० आमदार, ६० युवा छात्र नेते व ३० विचारवंत संबोधित करणार
पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसांच्या भारतीय छात्र संसदेेचे दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाइन आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे अकरावे वर्ष आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, प्रभारी कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, भारतीय छात्र संसदचे समन्वयक रविंद्रनाथ पाटील तसेच, युवा छात्र नेते सिमरदीप सयाल, विराज कावडिया, चेतन परदेशी व सम्राज्ञी तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभाखेरीज या छात्र संसदेमध्ये १०सत्रे आयोजित केली गेली आहेत. या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपले नाव www.bhartiyachhatrasansad.org वेबसाईटवर नोदणी करावी. तसेच सविस्तर माहितीसाठी http://www.bhartiyachhatrasansad.org / mitsog.org / mitwpu.edu.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
११व्या छात्र संसदेचे ऑनलाइन उद्घाटन गुरुवार, दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता होईल. या समारंभासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री मा.ना. श्री. राजनाथ सिंग हे प्रमुख पाहुणे असतील. सन्मानीय अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला हे असतील. राज्यसभा खासदार तिरूची शिवा, राज्यसभा खासदार निरज शेखर, खासदार माणिकम तगोरे, देशाचे माजी मुख्य निवडूक आयुक्त डॉ. नसिन झैद हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील. झारखंडचे राज्यपाल रमेश बायस हे अध्यक्षस्थानी असतील.
समारोप मंगळवार, दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होईल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. ना.श्री. मनसुख मांडविया हे प्रमुख पाहुणे असतील. खासदार पद्मश्री कुमार केतकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डॉ.एम. विरप्पा मोहली, कम्यूनिस्ट पक्षाचे प्रकाश करात आणि सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वॉरमेंटच्या संचालिका आणि पर्यावरणवादी सुनीता नारायण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्ष स्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे असतील.
सहा दिवस चालणार्या या छात्र संसदेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.श्री. नितिन गडकरी, ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली, उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती हृदय नारायण दिक्षीत, कॉग्रेसचे जेष्ठ नेते रशीद अल्वी, कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ, केरळ विधानसभेचे सभापती एम.बी. राजेश, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, खासदार अॅड. विवेक के. तनखा, डब्ल्यूएचओचे मुख्य संशोधनक सोमय्या स्वामी नाथन, योगेंद्र पुराणीक, छत्तीसगड विधानसभाचे उपसभापती मनोजसिंग मांडवी, माजी केंद्री मंत्री जयराम रमेश, लडाख येथील लोकसभा सदस्य जामयांग त्सेरिंग नामग्याल, न्यामुर्ती आदर्श कुमार गोयल, उत्तराखंडच्या वनपंचायतीच्या प्रमुख वनरक्षक श्रीमती ज्योत्सना सितलींग, मणिपूर विधानसभाचे उपसभापती कॉगखॉग रविंद्र सिंग, खासदार मनोज तिवारी, खासदार बाबूल सुप्रिओ, नामवंत अभिनेत्री नंदिता दास, अभिनेता पद्मश्री मनोज जोशी, शिवसेनेच्या नेत्या व अभिनेत्री उर्मीला मातोंडकर, आंध्रपदेश विधानसभेचे उपसभापती कोणाघुपती, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, बीएसईचे एमडी आणि सीईओ व अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आशिषकुमार चौहान, दिल्ली विधानसभेचे उपसभापती राखी बिर्ला, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश एन. संतोष हेगडे, खासदार संजय राऊत, राज्यचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे विधानपरिषदेचे अध्यक्ष बसोराज कोराटी, अराम विधानसभेचे उपसभापती डॉ. निमल मोमीन, भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष डॉ. कृष्णा बीर चौधरी, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत, अरूणाचल प्रदेश विधानसभे चे उपसभापती तेसंम काँगटे, परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण, जम्मू कश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दूला, मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती गिरीश गौतम, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्ता अॅड. जयवीर शेरगिल यांच्या सह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय उद्योग, कायदा, आध्यात्मिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर सहा दिवस चालणार्या या ११व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.
भारतीय छात्र संसदेविषयी :
तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतीकारक बदल घडवून आणणे, राष्ट्र व समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे, या हेतूने २०११ मध्ये भारतीय छात्र संसदेचा प्रारंभ झाला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक प्रा. राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संकल्पक व समन्वयक आहेत. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे या छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत. छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम असून, त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या अकराव्या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून २५ हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत.