व्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या संधी

व्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या संधी

मागील दशकापासून तांत्रिक प्रगतीमुळे व्यवसाय आणि उद्योगांत अमूलाग्र रुपांतर झाले आहे. आधुनिक कार्यस्थळांच्या गरजाही अधिक प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आभासी कार्यालये हे आजचे वास्तव आहे. त्यामुळे सध्या अनेक नियोक्ते अद्ययावत तंत्रज्ञान कौशल्यांसह नेतृत्व आणि व्यवस्थापन अशी भूमिका पार पाडण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत आहेत.- डॉ. एस. रामचंद्रन, संचालक, एसआयएमएमसीएकविसाव्या शतकात सर्व कौशल्य कॉर्पोरेट क्षेत्रात संचयित झाली आहेत. त्यामुळेच या क्षेत्रात कौशल्याच्या अभावामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. महामारीमुळे कामाचे आभासी स्वरुप प्रत्यक्षात अवतरले आहे. त्याचप्रमाणे महामारीमुळे कंपन्यांच्या कामातील नैतिकता, संस्कृती आणि कामाच्या प्रक्रियेत नाट्यमय बदल झाला आहे. कर्मचारीही नवीन बदल हळूहळू स्वीकारत आहेत. या कौशल्य संचात टीकात्मक परिक्षण, समस्येचे निराकरण, युक्तिवाद, विवेचन, माहितीचे एकत्रिकरण, संशोधन कौशल्य आणि पद्धती, सर्जनशीलता, नाविन्य, अभिव्यक्ती, चिकाटी, शिस्त, बदल स्वीकारण्याची क्षमता, उपक्रमशील, लेखी व तोंडी संभाषण कौशल्य, सार्वजनिक संभाषण व सादरीकरण, ऐकूण घेण्याची क्षमता, नेतृत्व, सांघिक काम, सहयोग, माहिती व तंत्रज्ञान साक्षर, माध्यम आणि इंटरनेट साक्षरता, नागरी, नैतिक, सामाजिक न्याय साक्षरता, आर्थिक साक्षरता, उद्योजकता, जागतिक जागरूकता, बहुसांस्कृतिक साक्षरता, मानवतावाद, पर्यावरण व संवर्धन साक्षरता, आरोग्य आणि कल्याण साक्षरता, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा इत्यादी कौशल्यांचा समावेश होतो.मुलांना बालवयातच ही कौशल्ये आत्मसात करता यावीत, त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नियमितपणे लागू होणारी, उपयुक्त, मागणी असलेली आणि सार्वभौम कौशल्ये शिकवण्याची गरज आहे. ही कौशल्ये त्यांना नोकरीस पात्र ठरवतात. त्यामुळे त्यांना कारकीर्दीचा आनंद घेता येतो. शब्द, बहुभाषिकता, शारीरिक शिक्षण, कला आणि हस्तकला, व्यवसायिक कौशल्ये, कला एकात्मिक शिक्षण, संज्ञानात्मक शिक्षण, चौकस-शोध-आधारित शिक्षण, कृत्रिम बुद्धीमत्ता, संरचना, समग्र आरोग्य, सेंद्रिय जीवन, पर्यावरण शिक्षण, जागतिक नागरिकत्व शिक्षण या महत्त्वाच्या विषयांना नवीन शिक्षण धोरणात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. बाजारपेठ अधिक गुंतागुंतीची, तंत्रज्ञानावर आधारित, अत्यंत स्पर्धात्मक आणि ज्ञान-आधारित झाली आहे. विद्यार्थ्यांची क्षमता समजून घेऊन त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांना स्वप्नवत नोकरी मिळवून देण्यात संस्था मोलाची भूमिका बजावतात. स्वप्नवत नोकरी मिळवण्यासाठी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविकेचे (पीजीडीएम) शिक्षण घेणे हे प्रत्येक पदवीधर तरुणाचे स्वप्न असते. पीजीडीएम हा अत्यंत प्रधान शैक्षणिक अभ्यासक्रम मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते. विद्यार्थ्यांना सैद्धांतिकदृष्ट्या शिक्षण घेण्याचा व्यवहारिक मार्ग या कार्यक्रमामुळे गवसला आहे. पीजीडीएम अभ्यासक्रम उद्योग संलग्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या संस्थेच्या व्यवस्थापनात सहज स्थान मिळू शकते.कॉर्पोरेट जगतात पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्यांना व्यावसायिक बदलांचे प्रशिक्षण दिले जाते. आणि पदवी मिळाल्यावर त्यांना नोकरी दिली जाते. पीजीडीएमचा अभ्यासक्रम ठरवण्यात कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग असतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या कालावधीत औद्योगिक/कॉर्पोरेट भेटी, इंटर्नशिप, नोकरी, प्रशिक्षण इत्यादींबाबत कॉर्पोरेट संधी दिली जाते. विद्यार्थी कॉर्पोरेटच्या सल्लागार उपक्रमातही सहभागी होतात. पीजीडीएमचा अभ्यासक्रम शिकवणार्या संस्था विद्यार्थ्यांना सर्वांगीण कौशल्य शिकवतात. शिक्षण संपल्यावर त्यांना अव्वल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये चांगल्या पैकेजची नोकरी मिळावी यासाठी संस्था परिपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात. नोकरी करणारे तरुण आणि विद्यार्थी भविष्यात उत्तम नोकरी मिळवण्यासाठी पीजीडीएम अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. दैनंदिन काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात देण्यात येते. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे एमबीएचे शिक्षण घेऊन कार्यरत असलेले असंख्य तरुण आणखी प्रगतीसाठी पीजीडीएम अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही जवळपास एक दशकापासून महाराष्ट्र सरकारच्या एआयसीटीई आणि डीटीई यांच्या संयुक्त विद्यमाने पीजीडीएम कार्यक्रम राबवणारी भारतातील प्रमुख संस्था आहे. या कार्यक्रमाच्या सदस्यांच्या सल्लागार मंडळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक, विविध डोमेन आणि विषयांमधील जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्तिंचा समावेश आहे. ते नियमितपणे विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्याबाबत मार्गदर्शन करतात. सूर्यदत्त येथील पीजीडीएम अभ्यासक्रमात व्यवसाय व्यवस्थापन, कॉर्पोरेट जगाची अधिक चांगली समज प्रदान करण्याबरोबरच जगातील व्यवसायावर लक्ष केंद्रित केले जाते. समग्र विकास आणि शिकणार्‍याला परिवर्तनात्मक अनुभव देणे ही सूर्यदत्तमधील शिक्षणाची ओळख आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, व्यवसायिक आणि वैयक्तिक प्रगती ही एकाधिक हस्तक्षेपांद्वारे सुनिश्चित केली जाते. त्यामध्ये शिक्षणाद्वारे दिलेली माहिती, ऑनलाईन शिक्षण, व्यवस्थापनातील ज्ञान, प्रकल्प, इंटर्नशिप कार्यक्रम, शिबिरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रकल्प भेट, आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसायिक संभाषण उपक्रमांचा समावेश आहे.सूर्यदत्त संस्थेकडे प्रख्यात आणि प्रशंसित शैक्षणिक भागीदारांची एक मजबूत परिसंस्था आहे. त्यामध्ये हार्वर्ड बिझिनेस स्कूल, हार्वर्ड पब्लिशिंग, आयआयएमबीएक्स, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन-एआयएमए, लिंकन युनिव्हर्सिटी -मलेशिया, टीसीएस आयन, राऊंड ग्लास वेल बेईंग, केम्ब्रिज बिझिनेस इंग्लिश, एसएपी, डॉ. एपीजे कलाम ट्रस्ट, सीआयएमएसएमई, बडा बिझिनेस, असोसिएशन ऑफ इंटर्नल कंट्रोल प्रॅक्टिशनर्स –यूके, रिस्क मॅनेजमेन्ट असोसिएशन ऑफ इंडिया इ. विद्यार्थ्यांना इयत्ता वर्गाच्या पलीकडे शिक्षण देऊन स्थानिक आणि जागतिक क्षेत्राशी संलग्न, सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनवणे. विद्यार्थी समुदाय आणि भविष्यातील संभाव्य कार्यस्थळाच्या अपेक्षांच्या अनुरुप कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब ही सूर्यदत्तचे वैशिष्ट्ये आहेत. सूर्यदत्त संस्थेने सर्जनशीलता वाढविण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इंडस्ट्री 4.0 इनोव्हेशन लॅबची स्थापना केली आहे.सूर्यदत्त संस्थेची आणखी माहिती मिळवण्यासाठी http://www.simmcpgdm.org या संकेतस्थळाला भेट द्या. पीजीडीएम अभ्यासक्रमांना वाढती मागणी आहे. नोकरीच्या उत्तम संधी, सर्व क्षेत्रात करिअरच्या संधी, जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या संधी आणि उद्योजकता शिकण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. पीजीडीएम अभ्यासक्रमांमुळे जागतिक पातळीवर करिअर विकास करण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *