पुणे : माणिकबाग परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी, तसेच सहाय्यक अभियंता दिनेश फुलझले यांची भेट घेतली. या भेटींदरम्यान नागरिकांच्या समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक नोकरदारांचे वर्क फ्रॉम होम सुरू असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे देखील ऑनलाईन क्लासेसवर परिणाम होत आहे. वीजपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठावर देखील या ठिकाणी विपरीत परिणाम होत आहे.
याबाबत नागपुरे यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या सर्व अत्यंत गंभीर बाबींची दाखल घेऊन महावितरणमधील वरिष्ठ अधिकारी व पुणे महानगर पालिकेशी समन्वय साधून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे नागपुरे यांनी म्हटले आहे. आठवड्याभरात हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दीपक नागपुरे म्हणाले.