डॉ. सुरेश नाईक, गुलशन राय, डौग ब्रूहॅके यांना ‘सूर्यदत्त लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२३’ प्रदान

डॉ. सुरेश नाईक, गुलशन राय, डौग ब्रूहॅके यांना ‘सूर्यदत्त लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२३’ प्रदान

डॉ. सुरेश नाईक, गुलशन राय, डौग ब्रूहॅके यांना ‘सूर्यदत्त लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२३’ प्रदान
युवा पिढीने नव्या युगाची कौशल्ये आत्मसात करावीत : डॉ. सुरेश नाईक
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढत जाणारे क्षेत्र : गुलशन राय
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर ‘सूर्यदत्त’चा भर : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
ग्लोबल चेंबरमुळे जागतिक स्तरावर विस्ताराची संधी : डौग ब्रूहॅके
‘सूर्यदत्त’तर्फे डॉ. सुरेश नाईक, गुलशन राय, डौग ब्रूहॅके यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
नाझरी मूहद, विक्रांत सक्सेना, शंकर दामोदरन, ऍडिइन्नूर हमीझाह, अमीरूल असरफ, डॉ. अमजद खान, दिनेश शर्मा यांचाही सन्मान
 
पुणे : “सर्वांगीण विकासाचे, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची परंपरा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने जपली आहे. भावी पिढीला घडवण्यासाठी सातत्याने सृजनशील उपक्रम येथे राबवले जात आहेत. विकसनशील भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी युवा पिढीने नव्या युगाचे तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करावीत,” असे मत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक यांनी व्यक्त केले.
 
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या वतीने आयोजित सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. नाईक यांच्यासह पंतप्रधानांचे सल्लागार गुलशन राय (तंत्रज्ञान व सुरक्षा), डौग ब्रूहॅके (ग्लोबल आंत्रप्रेन्युअरशीप) यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार २०२३’ देऊन सन्मानित करण्यात आले. नाझरी मूहद (डिजिटल ट्रान्सफॉर्मशन युझिंग एआय), विक्रांत सक्सेना (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी) यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२३’, शंकर दामोदरन (इंडो ग्लोबल सर्व्हिस), ऍडिइन्नूर हमीझाह (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स), अमीरूल असरफ (आंत्रप्रेन्युअरशीप) यांना ‘सुर्यगौरव ग्लोबल अवॉर्ड २०२३’, तर डॉ. अमजद खान, दिनेश शर्मा (गुरुजी उज्जैन) यांना ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ देऊन सन्मानित करण्यात आले.
 
बावधन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, कार्यकारी संचालक अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, अतुल देशपांडे, रंजना मोहिते आदी उपस्थित होते. सूर्यदत्त शिक्षण संस्था यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहेत. त्यामुळे वर्षभर विविध २५ कार्यक्रम आयोजिले जाणार असून, १०० वेगवेगळ्या क्षेत्रातील २५ व्यक्तींना असे २५०० व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
 
डॉ. सुरेश नाईक म्हणाले, ”भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी योगदान देऊ शकणारी युवापिढी चोरडिया दाम्पत्याच्या मार्गदर्शनात सूर्यदत्तमध्ये घडतेय, याचा आनंद वाटतो. विद्यार्थ्यांनी संशोधन, इनोव्हेशन करण्यावर भर द्यावा. नवनवे तंत्रज्ञान, कौशल्य आत्मसात करावीत. समाजातील चांगल्या व्यक्तींचा आदर्श घेऊन आयुष्यात वाटचाल करावी.”
गुलशन राय म्हणाले, ”हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आर्टिफिशिएल इंटेलिजन्स वाढत जाणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राला समजून घेऊन काम करण्याची गरज आहे. डेटा ऍनालॅटिक्स, डेटा वेअर हाऊस, सायबर सिक्युरिटी सारखे कोर्सेस यात आहेत. ‘सूर्यदत्त’मध्ये आधीपासूनच सायबर सुरक्षेचा अभ्यासक्रम शिकवत आहे, ही आनंदाची बाब आहे.”
डौग ब्रूहॅके यांनी सांगितले की, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया ग्लोबल चेंबरशी संलग्न आहेत, ही आमच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. ग्लोबल चेंबरचे कार्य विस्तारले जात आहे. जागतिक पातळीवर पोहोचण्याची इच्छा असणाऱ्यांनी सूर्यदत्तच्या माध्यमातून ग्लोबल चेंबरशी जोडून घ्यावे.”
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, ”विद्यार्थ्यांना सर्वांगीण, रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’ने नेहमी भर दिला आहे. आपल्या देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा. त्यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस विविध पातळ्यांवर काम करत आहे.”
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धांत चोरडिया यांनी आभार मानले.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *