पांडुरंगाच्या भक्तांची शुश्रूषा करणारा ‘वारकरी दवाखाना’

पांडुरंगाच्या भक्तांची शुश्रूषा करणारा ‘वारकरी दवाखाना’

पांडुरंगाच्या भक्तांची शुश्रूषा करणारा ‘वारकरी दवाखाना’

सिंबायोसिस विद्यापीठ व शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम 

पुणे: ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाचीच सेवा आहे. गेली २३ वर्षे पांडुरंग परमात्म्याची ही सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळतेय, याचा आनंद वाटत असल्याची भावना सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली.

सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी मुजुमदार यांच्या हस्ते झाला. सेनापती बापट रस्त्यावरील ‘सिंबायोसिस’च्या आवारात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार, पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, ‘सिंबायोसिस’च्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, सिंबायोसिस’च्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, महापालिकेचे आरोग्य प्रमुख भगवान पवार, शांतीलाल भटेवरा, ऍड. प्रतापसिंह परदेशी, अक्षय साळवे, निवेदिता एकबोटे, राधिका धिंग्रा आदी उपस्थित होते.

२००१ पासून सुरु असलेल्या या फिरता वारकरी दवाखान्यात यंदा १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि स्वयंसेवकांची टीम असणार आहे. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवा पुरवली जाणार आहे. पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरता वारकरी दवाखाना कार्यरत राहणार आहे, असे अॅड. अविनाश साळवे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *