आर्किटेक्चर,एन्व्हायर्नमेंटल डिझाईन,इंटेरियर,अर्बन प्लॅनिंग क्षेत्रातील प्रभावी कामगिरीचा गौरव
पुणे: पुणे येथील ‘व्ही के ‘ ग्रुप या आर्किटेक्चर, एन्व्हायर्नमेंटल डिझाईन, इंटेरियर आणि अर्बन प्लॅनिंग क्षेत्रात कार्यरत कंपनीला ‘बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड २०२१’ मिळाले आहे. दिल्ली येथे वर्ल्ड एचआरडी काँग्रेस आणि ग्लोबल रियल इस्टेट काँग्रेसने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘व्ही के ‘ ग्रुपच्या ऑपरेशन्स विभागाच्या भागीदार अपूर्वा कुलकर्णी आणि दीपाली बोकील यांनी हा पुरस्कार डॉ.रिटा जयरथ यांच्या हस्ते स्वीकारला.
‘बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड’ साठी दरवर्षी वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना निवडले जाते. मनुष्यबळ विकासासाठीचे उल्लेखनीय प्रयत्न आणि प्रभावी मार्केटिंग कम्युनिकेशन्ससाठी गौरविले जाते.
1973 साली आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी ‘व्ही के ‘ या ब्रँडची निर्मिती केली .आर्किटेक्ट ऋषिकेश कुलकर्णी, डॉ. पुर्वा केसकर ,अनघा परांजपे -पुरोहित, विजय साने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी आर्किटेक्चर,एन्व्हायर्नमेंटल डिझाईन ,इंटेरियर,अर्बन प्लॅनिंग क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. ग्रुपच्या ऑपरेशन्स विभागाची जबाबदारी अपूर्वा कुलकर्णी आणि दीपाली बोकील यशस्वीपणे सांभाळत असून कंपनीच्या योगदानाबद्दल यापूर्वीही अनेक प्रतिष्ठेचे सन्मान प्राप्त झाले आहेत . ‘बेटर बाय डिझाईन’ हे कंपनीचे मार्गदर्शक तत्व असून अनेक मोठे प्रकल्प यशस्वी करून या ग्रुपने मानदंड निर्माण केला आहे.
‘व्ही के ग्रुप ‘च्या प्रकल्प आणि उपक्रमांची अधिक माहिती https://vk-group.org/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे