बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अविनाश सांगोलेकर, स्वागताध्यक्षपदी डॉ. पांडुरंग भोसले यांची निवड

बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अविनाश सांगोलेकर, स्वागताध्यक्षपदी डॉ. पांडुरंग भोसले यांची निवड

 

पुणे, दि. ३-  विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय  (Mahatma Phule College in Pimpri, run by Vishwabandhuta Sahitya Parishad and Rayat Shikshan Sanstha )    यांच्या वतीने पुढील महिन्यात पिंपरी येथे होणाऱ्या बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांची, तर स्वागताध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व पद्‌मश्री नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. पांडुरंग भोसले यांची निवड  ( Senior writer, Dr. Avinash Sangolekar, has been elected as the president of the 12th Vishwafradhuta Student and Teacher Literary Conference to be held in Pimpri, while Dr. Pandurang Bhosale, the in-charge principal of the college, has been elected as the welcome chairman. )    करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

डॉ. सांगोलेकर यांच्या स्वलिखित १५ आणि संपादित १२ अशा २७ साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यातील ‘मराठी गझल: १९२० ते १९८५’, ‘दलित साहित्यः प्रवाह आणि प्रकार’ या विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. डॉ. भोसले हे गेल्या ३५ वर्षांपासून रयत सेवक म्हणून कार्यरत आहेत. २६ पुस्तकाचे त्यांनी संपादन केले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात सह‌भागी होऊन ४३ शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या काव्य व लेखणीला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *