नोंदणी व मुद्रांक विभागात पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; सुरवसे यांची कारवाईची मागणी

नोंदणी व मुद्रांक विभागात पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; सुरवसे यांची कारवाईची मागणी

नोंदणी व मुद्रांक विभागात पैसे घेतानाचा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल; सुरवसे यांची कारवाईची मागणी



पुणे, ता. ५: नोंदणी व मुद्रांक विभागात पैसे घेतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजरोसपणे उघडउघड पैसे घेताना अधिकारी व्हिडिओमध्ये दिसत असल्याने एकाच खळबळ माजली आहे. या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.



पुण्यातील हवेली क्र. ९चे सहदुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण दस्त नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ बुधवारपासून व्हायरल होत आहे. पैसे घेऊन बोगस दस्त नोंदणी केली जात असल्याच्या घटना पुढे येत आहेत. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून पैसे घेऊन दस्त नोंदणी करत असल्याचे हे चित्र गंभीर आहे. सर्वसामान्य जनतेची पिळवणुक करून स्वतःची पोळी भाजण्याचे काम चव्हाण यांच्यासारखे अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासुन करत आहेत.



रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “हनुमंत चव्हाण यांची चौकशी सुरु आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई का होत नाही. उघडपणे पैसे घेत असतानाचा हा व्हिडिओ सर्वसामान्य जनतेसमोर आला आहे. या खात्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि वरिष्ठ अधिकारी आतातरी या हवेली क्र. ९च्या दुय्यम निबंधकावर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार, हे पाहणे महत्वाचे आहे. हे अधिकारी कुणाच्या पाठिंब्याने राजरोसपणे सर्वसामान्य जनतेची पिळवणुक करून पैसा भ्रष्ट मार्गाने कमवत आहेत? अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *