वीर वरदान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे  आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा उत्साहात

वीर वरदान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे  आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा उत्साहात

 

पुणे, दि. १६ –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून वीर वरदान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रक्तदान शिबीर, धम्मवंदना, भीमगीते, शैक्षणिक साहित्याचे वाटप व महार बटालियनचा सत्कार समारंभ घेण्यात आला. स्नेहभोजनाने कार्यक्रमांची सांगता झाली.

वीर वरदान चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोरे यांच्या पुढाकारातून हे कार्यक्रम आयोजिले होते. पुणे सीरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकच्या सहकार्याने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ६० बाटल्यांचे संकलन करण्यात आले. महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या हस्ते बुद्धवंदना, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आंबेडकरी नेते यशवंत नडगम, युवा नेते रविंद्र जांभूळकर, मिलिंद आहिरे, सुनिल घेने, विशाल पवार, अविनाश जगताप, संगीता बोराडे, बळीराम संगेकर, प्रदिप पाटोळे, रूपेश पाईकराव, प्रशांत होनमाने, धनराज घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत जगताप, यशवंत नडगम यांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.

अविनाश मोरे म्हणाले, “कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, शालेय साहित्याचे व रोपांचे वाटप केले जाते. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिक व्यापक पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *