बालकांच्या सर्वांगीण विकासाला ‘बूस्टमायचाईल्ड’ची साथ

बालकांच्या सर्वांगीण विकासाला ‘बूस्टमायचाईल्ड’ची साथ

कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने शिक्षक-पालकांसाठी विकसित स्टार्टअपला वर्धन ग्रुपची एक कोटीची गुंतवणूक

पुणे : बालकांच्या सर्वांगीण विकासाला आता ‘बूस्टमायचाईल्ड’ या कृत्रिम बुद्धिमतेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) वापर करून शाळा, पालक व शिक्षकांसाठी बनवलेल्या खास ऍप व टुलकिटची साथ मिळणार आहे. ‘बूस्टमायचाईल्ड’ला लोकाभिमुख करण्यासाठी वर्धन ग्रुपच्या वतीने एक कोटी रुपयांची गुंतवणूक (प्री-सीड फंडिंग) करण्यात आली आहे, अशी माहिती वर्धन ग्रुपचे चेअरमन नितीन जावळकर व ‘बूस्टमाईचाइल्ड’चे संस्थापक विपुल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘बूस्टमायचाईल्ड’च्या सहसंस्थापिका अमृता जोशी, डिझाईन थिंकिंग एक्स्पर्ट प्रा. डॉ. भावना अंबुडकर उपस्थित होते.
 
 
विपुल जोशी म्हणाले, “बाल मानसशास्त्रज्ञ, बालरोगतज्ज्ञ, बालशिक्षणातील तज्ज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या चार वर्षांच्या एकत्रित संशोधनातून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन शिक्षण धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क अंतर्गत बालपणातील काळजी आणि शिक्षण उपक्रमांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विकसित केलेले हे पुरस्कारप्राप्त ऍप एक महिना ते ८ वर्षे वयोगटातील बालकांच्या शाळा, पालक व शिक्षकांना चालना देणारे ठरणार आहे. ‘स्कुल असेसमेंट मॉड्यूल’मुळे प्री-स्कुल आणि प्री-प्रायमरी शिक्षकांना बालकांचे मूल्यांकन करण्यासह शिक्षक आणि पालक यांच्यात अखंड संवाद साधणे शक्य होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून (कोणताही स्मार्टफोन किंवा टॅब्लेट) पालक आपल्या पाल्याचे २१ क्षेत्रांच्या समावेशातील ३६० डिग्रीमधील विकासाचे मूल्यांकन व विश्लेषण करू शकणार आहेत. मुलांमध्ये सुधारणा आणि त्यांचा उत्तम विकास होण्यास प्रोत्साहन देणारी सानुकूलित मार्गदर्शक तत्त्वे आणि पाल्यासाठी विशिष्ट क्रियाकलाप ॲपच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.”
 
नितीन जावळकर म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञान, गॅजेट्स, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे भावी पिढीला वेगळे वळण लागत आहे. आई-वडील दोघेही नोकरीत गुंतल्याने पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. त्यामुळे आपले मूल नेमके काय करत आहे, त्याची प्रगती, त्याच्या आवडीनिवडी, विषयातील पारंगतता व कल कुठे आहे, हे पालकांनी समजून घ्यायला हवे. आजच्या काळात ही गरज ‘बूस्टमाईचाइल्ड’ हा प्लॅटफॉर्म पूर्ण करतो, हे माझ्या लक्षात आले. बाल्यावस्थेतील परिपूर्ण विकास होण्यासाठी विपुल जोशी यांचे हे स्टार्टअप मला सामाजिकदृष्ट्या खूपच प्रभावी वाटले. या वयोगटातील बालकांशी निगडित पालक, शिक्षक व शाळांमध्ये याविषयी जागरूकता व त्याचा वापर वाढावा, या उद्देशाने वर्धन ग्रुपने पुढाकार घेत यामध्ये सुरुवातीला एक कोटींची गुंतवणूक केली आहे. राज्यातील प्रत्येक शाळांत हे ऍप पोहोचावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे.”
 
अमेरिकेत मास्टर ऑफ सायन्सचे शिक्षण घेतलेल्या पुणेकर सॉफ्टवेअर इंजिनिअर विपुल जोशी यांनी या स्टार्टअपची निर्मिती केली असून, त्याच्या विस्तारासाठी वर्धन ग्रुपकडून एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २०२१ मध्ये याची नोंदणी उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, एमएसएमईअंतर्गत झालेली आहे. तसेच अर्ली चाईल्डहूड डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने ‘इनोव्हेशन इन अर्ली इयर्स एज्युकेशन’ हा पुरस्कारही मिळालेला आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीममध्ये मे २०२३ मध्ये २० लाखांचा सीड फंड मिळालेला आहे. ‘बूस्टमाईचाइल्ड’मध्ये जोशी यांनी प्राथमिक स्तरावर वैयक्तिक मोठी गुंतवणूक केलेली असून, सध्या पूर्णवेळ १५, तर कंत्राटी पद्धतीवर पाच असे एकूण २० लोक काम करत आहेत. ‘बूस्टमाईचाइल्ड’ याविषयी अधिक माहितीसाठी www.boostmychild.com या संकेस्थळाला भेट द्यावी. तसेच गुगल पे स्टोअरवर हे ऍप विनामूल्य उपलब्ध आहे.
————————————
‘बूस्टमाईचाइल्ड’ची वैशिष्ट्ये:
– इंग्रजी, मराठी, हिंदी व असामी भाषेत उपलब्ध
– पालकांचे सक्षमीकरण, बालकाच्या विकास व वाढीसाठी सर्वसमावेशक साधन
–  पालकत्व कौशल्यांना चालना देण्यासाठी भरपूर ज्ञान, संसाधने आणि सूचना प्रदान करते
– पालक-शिक्षक यांच्यातील समन्वय वाढतो
– शिक्षकांना विद्यार्थ्याचे डिजिटल पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत
– कार्यक्षमता वाढवते, ऊर्जेची बचत होते, रिपोर्टकार्ड तयार होऊन पालकांना पाठवले जाते
– पालक-शिक्षकांशी संवाद साधून पाल्याची प्रगती जाणून घेऊ शकतात
– प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, घर व शाळा यांच्यातील सहकार्य अधिक वाढते
– बालकाच्या शैक्षणिक वाटचालीत सक्रिय सहभागासाठी पालकांना प्रोत्साहन
– बालकांच्या शैक्षणिक उपक्रमांत पालकांनाही आनंद घेण्याची संधी
– संज्ञानात्मक, शारीरिक आणि सामाजिक-भावनिक विकासास प्रोत्साहन
– पालक व शिक्षक बालकांच्या प्रगतीचे मूल्यांकन करू शकतील
– मुलाचे यश, त्याच्यातील क्षमता आणि सुधारणेसाठी वाव याची माहिती मिळते
– पालकांना तज्ज्ञांचे लेख, टिपा आणि बाल्यावस्थेतील विकासासाठी सल्ला
————————————
विपुल जोशी यांच्याविषयी:
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या विपुल जोशी यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मास्टर ऑफ सायन्स (एमएस) केल्यानंतर सहा वर्षे सॅनफ्रान्सिस्को येथे अग्रणी ओरॅकल या कंपनीत नोकरी केली. २००८ मध्ये भारतात परतल्यानंतर भारतासाठी आपण काहीतरी करायला हवे, या उद्देशाने संशोधन व टेलीकॉम क्षेत्रात सॉफ्टवेअरची निर्मिती केली. एक उद्योजक म्हणून नाविन्यपूर्ण उत्पादन आणि उत्तम सेवेच्या जोरावर त्यांनी ते सॉफ्टवेअर चार दक्षलक्ष डॉलर्सना विकले. पुढे सेवा क्षेत्रातही त्यांनी स्टार्टअप निर्माण केले. कोविडमुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर, साक्षरता लक्षात घेऊन विपुल यांनी आपल्या समविचारी मित्रांसमवेत ‘बूस्टमाईचाइल्ड’ या स्टार्टअपवर काम सुरु केले. सखोल संशोधन व नावीन्यतेचा उपयोग करत चार वर्षांत या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. त्याला भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत अनुदान मिळाले. तसेच ‘इनोव्हेशन इन अर्ली इयर्स एज्युकेशन’ हा पुरस्कारही मिळाला. येत्या काळात या ऍपचे ५० हजार वापरकर्ते व दोन कोटींची उलाढाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजवर २००० पेक्षा अधिक युजर्स हे ऍप वापरत आहेत. विविध खासगी शाळा व सरकारी शाळांमध्ये हे ऍप वापरण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
 
नितीन जावळकर यांच्याविषयी:
वर्धन ग्रुपचे चेअरमन असलेले नितीन जावळकर गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१८ मध्ये वर्धन ग्रुपच्या स्थापनेनंतर त्यांनी गुंतवणूक, अधिग्रहण व कायदेशीर प्रक्रिया, सल्ला व मार्गदर्शन क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. प्रामाणिकता, वचनबद्धता, नाविन्यता, ग्राहकांचे समाधान, जबाबदारी व बांधिलकी या मूल्यांवर आधारित वर्धन ग्रुप दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासह जावळकर यांनी सामाजिक बांधिलकीचे भान जपलेले आहे. वृद्धाश्रम, अनाथांसाठी काम करणाऱ्या संस्था यासह शिक्षण, आरोग्य व कौशल्य विकासाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येणारी पिढी सुसंस्कृत व्हावी, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या हेतूने ‘बूस्टमाईचाइल्ड’ या स्टार्टअपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि त्याला व्यापकता प्राप्त करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *