‘वंचित विकास’तर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन; २५ व्यावसायिकांचा सहभाग
पुणे : विपरीत परिस्थितीवर मात करून ‘पुनश्च हरिओम’ करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या (Small Businesses) विविध उत्पादनांचे प्रदर्शन (Exhibition) वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार (दि. १४) व मंगळवार (दि. १५) या दोन दिवशी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, (Balgandharva Rangmandir) पुणे येथे हे प्रदर्शन होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले (Open to all free) असणार आहे.
कोरोनाच्या काळात छोट्या व्यावसायिकांना वंचित विकास संस्थेकडून (Vanchit Vikas) त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी अर्थसाह्य केले होते, त्यांचे तसेच छोट्या व्यावसायिकांच्या (प्राधान्याने स्त्री व्यावसायिकांची) उत्पादनांचे प्रदर्शन भरविले आहे. एकूण २५ स्टॉल असून यामध्ये खाद्यपदार्थ, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, ज्वेलरी, पर्स, बॅग्ज, हार्बल कॉस्मेटिक्स, सेंद्रिय भाजी, धान्य, गिर गाईचे तूप, मेंदी इ. चा समावेश आहे. तसेच ई-वेस्ट व सामाजिक संस्थेची माहिती देणाराही स्टॉल असेल, असे वंचित विकास संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.